Download App

Kangana Ranaut: कंगनाचं चाहत्यांना मोठं गिफ्ट; आगामी ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट आली समोर

Emergency Release Date Out: गेल्या वर्षी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतचे (Kangana Ranaut) अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) अपयशी ठरले. अभिनेत्री आता 2024 मध्ये तिच्या चरित्रात्मक नाटक ‘इमर्जन्सी’द्वारे (Emergency Movie) मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होता, पण त्यादरम्यान त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता अखेर अभिनेत्रीने चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह ‘इमर्जन्सी’ची अधिकृत नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.


‘इमर्जन्सी’ कधी येणार? ‘इमर्जन्सी’ हा एक राजकीय नाटक आहे. या चित्रपटात कंगना राणौतने भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ram Mandir Pran Pratishtha) हजेरी लावल्यानंतर कंगना राणौतने तिच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘इमर्जन्सी’चे नवीन पोस्टर जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

यासोबतच कंगना राणौतने लिहिले आहे की, “भारतातील सर्वात अंधकारमय काळामागील कथा उघड करा. 14 जून 2024 रोजी आणीबाणीची घोषणा करून, सर्वात भयंकर आणि ज्वलंत पंतप्रधान इंदिरा गांधी थिएटरमध्ये गर्जना करताना इतिहासाचा साक्षीदार जिवंत करण्याचा प्रयत्न.” “14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये आणीबाणी.”

Katrina Kaif Deepfake Video: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ पुन्हा डीप फेकच्या जाळ्यात!

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ची स्टार कास्ट: कंगनाने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे, हे विशेष. कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे.

कंगना राणौत काल अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात दिसली होती. यावेळी अभिनेत्रीने राम मंदिरासमोरील तिचे अनेक फोटो शेअर केले होते. साडी परिधान केलेल्या पारंपारिक लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी रामलाला प्राण प्रतिष्ठानंतर आनंदात नाचणाऱ्या कंगनाने जय श्री रामचा नाराही दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

follow us

वेब स्टोरीज