Box Office : रिलीजच्या चौथ्या दिवशी दणक्यात आपटला ‘मेरी ख्रिसमस’, कतरिना कैफचा सिनेमा डब्बागुल?

Box Office : रिलीजच्या चौथ्या दिवशी दणक्यात आपटला ‘मेरी ख्रिसमस’, कतरिना कैफचा सिनेमा डब्बागुल?

Merry Christmas Box Office Collection Day 4: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ला (Merry Christmas Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट तिकीट खिडकीवर टिकून राहण्यासाठी धडपडत आहे. यासोबतच महेश बाबूचा ‘गुंटूर करम’, तेजा सज्जाचा ‘हनुमान’ आणि धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ यासह अनेक सिनेमाना ‘मेरी ख्रिसमस’ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर द्यावी लागणार आहे. यामुळे देखील ‘मेरी ख्रिसमस’ अपेक्षेप्रमाणे चालत नसल्यचे दिसत आहे. चला जाणून घेऊया कतरिना आणि विजयच्या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)


रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘मेरी ख्रिसमस’ने किती कमाई केली? ‘मेरी ख्रिसमस’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजयची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. या दोघांनीही चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे, पण ‘मेरी ख्रिसमस’ला चित्रपटगृहांमध्ये फारसे प्रेक्षक मिळत नाहीत आणि त्यामुळे चित्रपट फारशी कमाई करू शकलेला नाही. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘मेरी ख्रिसमस’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी चित्रपटाने 3.45 कोटी तर तिस-या दिवशी 3.83 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मेरी ख्रिसमस’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 1.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘मेरी ख्रिसमस’च्या चार दिवसांची एकूण कमाई आता 11.38 कोटींवर पोहोचली आहे.

‘मेरी ख्रिसमस’ चार दिवसांत 15 कोटींचीही कमाई करू शकला नाही: ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर खराब स्थितीत आहे. रिलीजच्या चार दिवसांत हा चित्रपट 15 कोटींचा गल्लाही करू शकलेला नाही. बऱ्याच संघर्षानंतर हा चित्रपट काही कोटींची कमाई करू शकला आहे. अशा परिस्थितीत 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा निम्मा खर्चही वसूल करणं अवघड झालं आहे. या चित्रपटासह प्रदर्शित झालेल्या महेश बाबूच्या ‘गुंटूर करम’ने चार दिवसांत 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर तेजा सज्जाच्या ‘हनुमान’ या चित्रपटानेही चार दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shivrayancha Chhava चे भव्यदिव्य गीत ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘मेरी ख्रिसमस’ची स्टार कास्ट: ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट फ्रेडरिक डार्ड यांनी लिहिलेल्या फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. कतरिना कैफचा विजय सेतुपतीसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आला आणि प्रदर्शित झाला.

या चित्रपटातील मुख्य कलाकारांशिवाय राधिका आपटे, आदिती गोवित्रीकर आणि संजय कपूर यांनीही चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत. नाताळच्या मुहूर्तावर घडणारी एक घटना दोन व्यक्तींच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवून आणते हे या चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube