Download App

डॅशिंग कंगनाला आलाय खासदारकीचा कंटाळा; म्हणाली, “मला खरंच माहित नव्हतं की..”

खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल.

Kangana Ranaut : हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि विद्यमान भाजप खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. राजकारणाचं वारं तिला मानवलेलं दिसत नाही हे तिच्या अलीकडच्या वक्तव्यांवरुन दिसून येत आहे. मी कधीच विचार केला नव्हता की खासदार बनणं इतका हेक्टिक जॉब असेल. खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल. मला खरंच अपेक्षित नव्हतं की हे काम इतकं डिमांडिंग असेल.

कंगनाने टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकारणातील आपले अनुभव शेअर केले. खासदार होण्याआधी काय सांगितलं गेलं होतं याचाही खुलासा तिने या मुलाखतीत केला. ज्यावेळी मला ही ऑफर दिली गेली त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की साधारण 60 ते 70 दिवस संसदेत उपस्थित राहावं लागेल. उर्वरित वेळेत तुम्हाला तुमची अन्य कामे करता येतील. हे मला त्यावेळी ठीक वाटलं होतं पण खरंतर हे काम खूप डिमांडिंग आहे.

वाढीव लाईट बिलावरून टीका पण वीज मंडळाने हिस्ट्री काढताच कंगनाच ठरली डिफॉल्टर

राजकारण कंगनाच्या आवाक्याबाहेर

याआधी कंगनाने मान्य केलं होतं की तिला राजकारण आता तितकसं आवडत नाही. ऑल इंडिया रेडिओच्या आत्मनिर्भर इन रवि पॉडकास्टमध्ये कंगनाने खासदार झाल्यानंतर काय काय आव्हानं स्वीकारावी लागली याचा खुलासा केला होता. राजकारणातून मला आनंद मिळालाच नाही असेही कंगनाने स्पष्ट केले होते. कंगना म्हणाली, मला आता या गोष्टी समजू लागल्या आहेत. राजकारणात समाधान मिळत नाही असं मी म्हणणार नाही. राजकारण हे एक खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे. समाजसेवे सारखं. पण मी कधी लोकांची सेवा करण्याचा विचार केला नव्हता असे कंगना म्हणाली.

follow us