Download App

करण जोहरने शरीराच्या ‘या’ भागाचा काढला विमा; दक्षिण कोरियात जाण्याचं कारण काय..

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने दक्षिण कोरियात जाऊन चेहऱ्याचा विमा उतरवून घेतला आहे.

Karan Johar : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरसंदर्भात एक मोठी बातमी  (Karan Johar) समोर आली आहे. बातमी थोडी वेगळी आहे. करण जोहरने याआधी ट्रान्सफॉर्मेशन करून सगळ्यांनाच चकीत केले होते. यानंतर तो चांगलाच फिट दिसत आहे. आता त्याने त्याच्या चेहऱ्याचा विमा उतरवल्याची (Face Insurance) माहिती मिळाली आहे. करण जोहरने यासाठी थेट दक्षिण कोरिया गाठला (South Korea) आणि येथे त्याने फेस इन्शुरन्स करवून घेतला.

नेमकं प्रकरण काय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेड्डीटवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आला आहे की करण जोहर अनेकदा कुणालाही न सांगता दक्षिण कोरियात गेला होता. येथे त्याने त्याच्या चेहऱ्याचा विमा काढला आहे. खरंतर चेहऱ्याचाच विमा काढण्याच काय तर या ठिकाणी हा ट्रेंड आहे. करणने याबाबत अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही. या विम्यासाठी त्याने किती पैसे खर्च केले याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

‘मुंजा’च्या पहिल्या वाढदिवसाला डान्स वर्कशॉपमध्ये अचानक पोहोचत शर्वरीने दिली चाहत्यांना खास ट्रीट

जर या गोष्टी खऱ्या असतील तर चेहऱ्याचा इन्शुरन्स करणारा करण जोहर हा काही पहिलाचे सेलिब्रिटी नाही. याआधी अमिताभ बच्चन, प्रियंका चोपडा, जॉन अब्राहम यांनी देखील त्यांच्या बॉडी पार्ट्सचा विमा केलेला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे तर जॉन अब्राहमने त्याच्या कंबरेचा विमा काढल्याचे सांगितले जाते. हॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या शरीराच्या अवयवांचा विमा काढला आहे. यासाठी त्यांनी भरपूर पैसेही खर्च केले आहेत. जेनिफर लोपेझने तिच्या कर्व्हचा 27 लाखांचा विमा काढला आहे. तर मारिया कॅरीने पाय आणि व्होकल कॉर्डचा विमा काढला आहे. यासाठी तिने 70 लाख रुपये खर्च केले आहेत.

चेहऱ्याचा विमा म्हणजे काय?

शरीराच्या एखाद्या अवयवाचा विमा काढणे आजकाल एक ट्रेंड बनला आहे. विशेषतः चित्रपट क्षेत्रातील मंडळी, सेलिब्रिटी यांच्याकडून विविध बॉडी पार्ट्सचे विमे काढले जातात. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. खरंतर हा त्यांच्या ब्रँडचा आणि उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत देखील आहे. यात चेहरा सर्वाधिक महत्वाचा आहे. कारण, चेहरा संरक्षण करण्यासारखा घटक मानला जातो. त्यामुळे विमा कंपन्या (Insurance Company) चेहऱ्याच्या विम्यासाठी विशेष पॉलिसी ऑफर करतात. या विम्यात दुखापतीने चेहरा विद्रुप झाला असेल किंवा अन्य काही नुकसान झाले असेल तर या नुकसानीची भरपाई मिळते.

आमिर खानच्या घरी ‘सितारे जमीन पर’ टीमसाठी म्युझिकल नाईट! दिग्गजांची सरप्राइझ हजेरी

follow us