Karan Johar: ‘वकीलांची टीम प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट आधी का वाचते? अभिनेत्याने सांगितले कारण…

Karan Johar: ‘वकीलांची टीम प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट आधी का वाचते? अभिनेत्याने सांगितले कारण…

Karan Johar Soft Target: चित्रपटांबाबत (Bollywood ) अनेकदा वाद होतात. कधी स्क्रिप्टवरून, कधी गाण्यावरून तर कधी कपड्यांवरून राडा सुरू होतो. अशा अडचणीत येऊ नये म्हणून प्रॉडक्शन (Production) हाऊसने आता कायदेशीर टीम्सची नियुक्ती सुरू केली आहे. (Karan Johar) चित्रपट बनण्याआधीच लिगल टीमकडून स्क्रिप्टचे पुनरावलोकन केले जाते (Target) आणि अशा प्रकारे निर्माते वादग्रस्त भागाला वाद निर्माण होण्यापूर्वीच सेन्सॉर करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


करण जोहरनेही (Karan Johar) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर थेटच भाष्य केले आहे. म्हणाला की, चित्रपटाविरुद्ध ऑनलाइन टार्गेटिंग आणि कोर्ट केसेसचा उल्लेख केला आहे. म्हणाला की, बॉलीवूड हे सॉफ्ट टार्गेट आहे, त्यामुळे वाद टाळण्यासाठी कायदेशीर टीमची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे.

पुढे तो सेल्फ सेन्सॉरशिपबद्दल बोलताना म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीत अडकू अशी भीती असते. आता प्रत्येक संस्थेत विधी विभाग आहे. आम्ही सिनेमा काढत असताना आम्हाला न्यायालयीन खटला, एफआयआर नको असतो, जेणेकरून आम्हाला त्यातून वाचवता येईल. प्रत्येक स्क्रिप्ट, मग ती धर्मा प्रॉडक्शनची असो किंवा आमच्या डिजिटल प्रॉडक्शन धर्माटिक एंटरटेनमेंटची, आधी अंतर्गत कायदेशीर सेन्सॉरशिपमधून जाते, आणि त्यानंतरच आम्ही पुढे जाऊन चित्रपट बनवत, असल्याचे करण जोहरने सांगितले आहे.

भितीपोटी कायदेशीर पथक ठेवले ? 

करण पुढे म्हणाला की, आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही हे करत नाही, आम्हाला फक्त कोर्ट केस लढण्याचा ताण आणि दबाव घ्यायचा नाही आणि अशा गोष्टींवर जास्त वेळ आणि पैसे खर्च करायचं नाही. यादरम्यान ते म्हणाले की, जे विरोध करतात, अशा लोकांना विनाकारण आवाज काढण्याची सवय असते.

करण पुढे म्हणाला, “कधीकधी मला असे वाटते की हे सर्व घडते कारण बॉलीवूड किंवा भारतीय चित्रपट हे सॉफ्ट टार्गेट आहे. बरेच लोक आहेत, ते वेगळे बोलतात आणि करतात, परंतु आपण काही बोललो की आपण सर्वत्र दिसू लागतो. आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत हे खरे आहे. ही जीवनाची विडंबना आहे.

karan Joharने रिलीज केला ‘Rocky Aur Rani’ चा नवा प्रोमो

करणने न्यायालयात याचिका दाखल केली

अलीकडेच ‘शादी के दिग्दर्शक करण ओह जोहर’ या चित्रपटासाठी करण जोहरने स्वतः त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात आदेश काढावेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube