Download App

Tiger Shroff: वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले चाहत्याचे मन

Tiger Shroff On WPL 2024: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अभिनीत ‘बडे मिया छोटे मिया’ (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगरने त्याच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांना मोहित केलं आहे. टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो, यात काही शंका नाही.

2024 मधल्या या खास इव्हेंटमध्ये त्याने धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि टायगरचा खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी #TheTigerEffect अनुभवला आहे. प्रेक्षकांचा लाडका युथ आयकॉन म्हणून त्याची असलेली अनोखी ओळख #TheTigerEffect प्रेक्षकांच्या हृदयाचा आणि मनाचा ताबा घेते.

ट्रेडमार्क आणि अफलातून स्टंट्सने टायगरने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो मनोरंजनाच्या जगात एक बेस्ट अभिनेता आहे. या खास इव्हेंटच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगताना टायगरने WPL 2024 चे आयोजक आणि चाहत्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा

टायगर व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपापल्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांच्या परफॉर्मन्सने मंचावर लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सुपरस्टार शाहरुख खान ने केलं. टायगर त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असून यामध्ये तो आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. सोबतीला टायगर लवकरच ‘सिंघम अगेन’ मध्येही ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

follow us

वेब स्टोरीज