Download App

Border 2: 27 वर्षानंतर पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; ‘बॉर्डर 2’ ची घोषणा

Border 2 Announcement: सनी देओलने (Sunny Deol) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Border 2 Announcement: सनी देओलने (Sunny Deol) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘गदर 2’च्या (Gadar 2) यशानंतर सनी देओलने आता त्याच्या पुढच्या ‘बॉर्डर 2’ (Border 2 ) चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. सनी पाजी ‘बॉर्डर 2’ घेऊन येत असल्याची चाहत्यांना कल्पना होती. पण आता अधिकृत घोषणेने चित्रपटावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुपरस्टारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे.


सनी देओलने शेअर केलेला व्हिडिओ व्हॉईसओव्हरने सुरू होतो. ज्यामध्ये अभिनेत्याचा आवाज ऐकू येतो. सनी म्हणते, “27 वर्षांपूर्वी एका सैनिकाने तो परत येईल असे वचन दिले होते. तेच वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा भारताच्या मातीला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. इतकेच नाही तर हा व्हिडिओ शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 27 वर्षे जुने वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक सैनिक येत आहे. भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट ‘बॉर्डर 2’.

27 वर्षांपूर्वीचा ‘बॉर्डर’

‘बॉर्डर’चा सिक्वेल तब्बल 27 वर्षांनंतर येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 1997 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले होते. 27 वर्षांपूर्वी ही मोठी किंमत असायची. ‘बॉर्डर’ने त्या काळात बॉक्स ऑफिसवर 39.45 कोटींचा जबरदस्त व्यवसाय केला होता. हा चित्रपट जेपी दत्ता यांनी बनवला होता. या फोटोमध्ये सनी देओलशिवाय इतर अनेक मोठे स्टार्सही उपस्थित होते.

Sunny Deol: ‘बॉर्डर’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…

‘गदर 2’च्या यशानंतर घेतलेला निर्णय

‘गदर 2’ च्या जबरदस्त यशानंतर सनी देओलला खात्री पटली की आजही त्याच्या चाहत्यांना त्याचे जुने चित्रपट खूप आवडतात. ‘गदर’च्या सिक्वेलनंतर सनी आणि निर्मात्यांनी त्यांच्या मोठ्या हिट चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याची योजना सुरू केली, त्यामुळे ‘बॉर्डर 2’चा विचार झाला. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून शूटिंगचा मोठा भागही पूर्ण झाला आहे. आता ‘गदर 2’ प्रमाणे ‘बॉर्डर 2’वरही प्रेक्षक आपल्या प्रेमाचा वर्षाव करतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us