Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले तब्बल इतके कोटी रुपये

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले तब्बल इतके कोटी रुपये

Allu Arjun Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ ची (Pushpa 2 Movie ) आतुरतेने वाट पाहत आहे. हे चित्र यावर्षी 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि त्याच्या गाण्यांनी रेकॉर्ड केले आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची ‘पुष्पा-पुष्पा’ (Pushpa Song) आणि ‘अंगारे’ ही दोन गाणी रिलीज झाली होती. (Social media) या गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटातील गाण्याच्या मूळ आणि डब व्हर्जनने विक्रम केले आहेत. काय आहे हा विक्रम चला तर मग जाणून घेऊया…

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)


‘पुष्पा-पुष्पा’ सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या 50 तेलुगू गाण्यांच्या यादीत सामील झाले आहे. जगातील टॉप 100 म्युझिक व्हिडिओंच्या यादीत त्याच्या हिंदी आणि तेलुगु आवृत्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पुष्पा-पुष्पा’च्या हिंदी आवृत्तीने 57 व्या स्थानावर आणि तेलगू आवृत्तीने 79 व्या स्थानावर आपले स्थान निर्माण केले आहे.

‘पुष्पा 2’च्या गाण्यांनी हा विक्रम केला

दरम्यान, ‘पुष्पा’चे ‘द कपल साँग’ खूप चर्चेत आहे आणि त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. याच्या तेलगू आवृत्तीचे नाव ‘सुसेकी’ आहे. या गाण्याने हिंदी आवृत्तीच्या यादीत आठव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. ही गाणी राष्ट्रीय पुरस्कार विजेते देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘पुष्पा-पुष्पा’ रिलीज होताच, 24 तासांच्या आत भारतातील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत त्याचा समावेश झाला. रिलीजनंतर, हे गाणे जगभरात ट्रेंडिंगमध्ये 15 व्या क्रमांकावर होते. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नसून त्यातील गाण्यांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

Mirzapur 3 Release Date : ‘मिर्झापूर 3’ कधी रिलीज होणार? अली फजलच्या पोस्टने चाहते हैराण

या चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे थिएटरचे हक्क उत्तरेत 200 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. असे सांगितले जात आहे की या सिनेमाचे ओटीटी अधिकार देखील विकले गेले आहेत, जे नेटफ्लिक्सने सुमारे 200 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. बघितले तर या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बजेटचे पैसे खर्च केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज