Boys 4 Title Song : बॉईज 4 मधील टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका आयोजित कार्यक्रमादरम्यान हे टायटल सॉन्ग प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रत्येकाला हे सॉन्ग थिरकायला लावणारंच असल्याचं दिसून येत आहे.
प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्तेसह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने आता हे त्रिकुट गायकही बनले आहे. अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत लाभलेल्या या गाण्याला ऋषिकेश कोळी यांनी शब्दबद्ध केले आहे. यापूर्वीही बॉईजच्या प्रत्येक भागातील गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावले. आता हे टायटल सॉन्ग तरुणाईला भुरळ घालणारेच असणार यात काही शंका नाही.
Asian Games 2023 : आणखी एक ‘सुवर्ण’वेध! एअर पिस्टल प्रकारात टीम इंडिया अव्वल
या टायटल सॉन्गमध्ये धैर्या, ढुंग्या आणि कबीर या गाण्यातही धमाल करताना दिसत आहेत. या गाण्यातून त्यांचा स्वॅगही दिसत आहे. त्यामुळे आता लवकरच ‘बॉईज ४’ची ही नवीन हूक स्टेपही तरुणाईत प्रचलित होणार असल्याचं दिसून येत आहे.
‘नितेश राणेंनी वावड्या उठवू नये’; विजय वडेट्टीवारांनी भरला दम
बॉईजच्या आधीच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता, हे गाणेही तितकेच वजनदार असावे, असे आम्हाला वाटत होते. तीन भागांना मिळालेले प्रेम पाहाता चौथ्यासाठी आमची जबाबदारी अधिक वाढली होती.
मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!
यात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने यावेळी आम्ही सुमंत, पार्थ आणि प्रतीकला गाण्याची संधी दिली आणि या संधीचे त्यांनी खरंच सोने केले. अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे गाणे गायले. मलाही त्यांच्यासोबत गाताना मजा आली असल्याचं अवधुत गुप्ते म्हणाले आहेत.
Loksabha 2024 : INDIA आघाडीचे लक्ष सेमीफायनलवर; नव्या वर्षात होणार फायनलची तयारी
या चित्रपटाचे लेखन ऋषिकेश कोळी यांनी केलं असून विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तूत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत.