Download App

कलाविश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचं निधन

Chandrashala director Prematai Sakhardande passed away : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे (Prematai Sakhardande) यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 6 मार्च गुरुवारी रात्री 10 वाजता त्यांचे निधन (Entertainment News) झालेय. प्रेमाताई साखरदांडे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनयाची छाप सोडलेली आहे. ध्वनिमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या प्रेमाताई कन्या (Marathi Actress) होत्या.

प्रख्यात अभिनेत्री, आविष्कार आणि चंद्रशालेच्या संस्थापकांपैकी एक तसेच चंद्रशालेच्या संचालक, चलेजावच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या, हाडाच्या शिक्षिका, शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी नाटक या माध्यमाचा एकूणात व्यक्तिमत्त्व विकासाच्या (Prematai Sakhardande passed away) प्रक्रियेत कसा उपयोग होऊ शकेल, यासाठी अलिकडेच महत्त्वाच्या आणि बालरंगभूमीसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या दोन पुस्तकांच्या लेखिका, मुळात बालरंगभूमीकडे चळवळीबद्दलच्या आस्थेने पाहत अग्रेसर असणाऱ्या अशा बहुपेडी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाताई साखरदांडे ह्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्या 94 वर्षांच्या होत्या.

मुलांना सांभाळा, रस्त्यावर धांगड धिंगा चालणार नाही; पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना भरला सज्जाड दम

राष्ट्र सेवादलात घडलेल्या प्रेमाताई आपल्या प्रत्येक भूमिकेतून, कृतीतून साने गुरूजींचे, “खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे.. ” हे शब्द जगल्या आणि इतरांना जगण्याची हीच प्रेरणा शेवटपर्यंत देत राहिल्या. आपल्या सहजत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि जाहिरात क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.आविष्कार आणि चंद्राशालेतील आणखी एक ज्येष्ठ सदस्य, मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्याचं दु:ख गहिरं आहे.

टॉयलेट साफ करायचो, गाड्या अन् लाद्या पुसायचो…लक्ष्मण उतेकरांचा संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास

आजवर किमान पाच सुसंस्कृत पिढ्या घडवणाऱ्या प्रेमाताईंना आविष्कार आणि चंद्राशालेकडून श्रद्धांजली वाहण्यात आलीय. प्रेमाताई साखरदांडे यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरलेली आहे.

 

follow us