Download App

मोठी बातमी! सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण; रिया चक्रवर्तीला कोर्टाने बजावली नोटीस

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे.

  • Written By: Last Updated:

Court Notice to Rhea Chakraborty : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. यामध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. (Chakraborty) सीबीआयनं या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने तपास करत मार्च 2025 मध्ये हा अहवाल कोर्टात सादर केला होता. ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. यामध्ये रियाला सीबीआयच्या अहवालावर आक्षेप घेण्याची संधी देण्यात आली आहे.

तिसरी ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा हद्दपार! एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर

मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी याप्रकरणी जारी केलेल्या नोटीसला 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीनं साल 2020 मध्ये सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितु सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. यात डॉ. तरुण नथुराम यांचाही समावेश होता. या तिघांना तिने सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. रियाने तक्रारीत आरोप केला होता की, या तिघांनी संगनमतानं सुशांतसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने काही औषधं आणली होती.

सुशांत हा बायपोलर डिसऑर्डरनं ग्रस्त होता आणि त्याच नैराश्यात तो अनेकदा औषधे घेणे बंद करायचा, उपचारात हयगय करायचा. हा एक मानसिक आजार असल्यानं मानसोपचारतज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध मिळणं अशक्य आहे. मात्र तरीही त्याच्या बहिणींना एका कॉल किंवा मेसेजवर ही औषधे मिळत होती. त्यासाठी या दोघी डॉक्टरच्या मदतीनं बनावट प्रिस्क्रिप्शन वापरत असल्याचा रियानं आरोप केला होता.

आता यावर सीबीआयने एक अहवाल सादर केला आहे. तो रिया स्वीकारते की त्यावर आक्षेप घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुळचा बिहारचा रहिवासी असलेला 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे (मुंबई) येथील अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. आता पाच वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

follow us