Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’मधील ‘या’ भूमिकेसाठी रियाने दिले ऑडिशन, अभिनेत्याचा मोठा खुलासा
Rhea Chakraborty Auditioned For Laal Singh Chadha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty ) सध्या चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्यात खूप काही सहन करून तिने ज्या प्रकारे पुनरागमन केले त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. रिया तिचे स्वतःचे पॉडकास्ट घेऊन आली आहे, ज्यामध्ये ती अनेक बड्या स्टार्ससोबत त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. आमिर खान (Aamir Khan) Chapter 2 च्या नवीन भागात आला. ज्यामध्ये रियाने खुलासा केला होता की तिने लाल सिंह चड्ढासाठी (Laal Singh Chadha) ऑडिशन दिले होते.
View this post on Instagram
रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने सांगितले की, लाल सिंग चड्ढाच्या ऑडिशनदरम्यान तो पहिल्यांदा रियाला भेटला होता. रियाला ती भूमिका मिळाली नाही पण आमिरने तिला मेसेज करून तिच्या अभिनय कौशल्याचं तोंडभरून कौतुक केले होते.
आमिरने रियाला मेसेज केला
आमिर खानला रियाची स्क्रीन टेस्ट आवडली पण करिनाला लीड रोल मिळाला. नंतर आमिरने रियाला मेसेज केला, जे पाहून ती खूपच आश्चर्यचकित झाली. रिया म्हणाली- ‘तू मला मेसेज पाठवला आहेस. जे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते, कारण मी हजारो चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या आहेत पण माझ्यासोबत असे कधीच घडले नाही. जेव्हा तुम्हाला चित्रपट मिळत नाही पण निर्माता-दिग्दर्शक तुम्हाला मेसेज करतात आणि म्हणतात, सॉरी, तुमची ऑडिशन चांगली होती पण सत्य हे आहे की आम्ही तुमच्यासोबत पुढे जाऊ शकत नाही पण तुम्ही चांगले केले आणि मला धक्का बसला. मी माझ्या आई आणि वडिलांना मेसेज दाखवला आणि म्हणाले की बघ, मी उत्तम अभिनेत्री आहे.
आमिर पुढे म्हणाला की, ‘मला वाटतं जेव्हा तुम्ही अभिनेता म्हणून संघर्ष करत असता, कारण जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा मी खूप ऑडिशन्स द्यायचो आणि सगळीकडे नाकारले गेले. मला ती भावना समजते. त्यामुळे मला असे वाटते की मला ती भूमिका मिळाली नाही, तर असे सांगितले पाहिजे. नाहीतर मी वाट पाहिली असती आणि मला ती भूमिका मिळेल की नाही असा प्रश्न पडला असता. मग मला मीडियावरून कळेल की दुस-या कोणाला कास्ट केले आहे.
Rhea Chakraborty: खुपच वाईट! ‘दिग्दर्शक-निर्माते चित्रपटात…’, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
रियाचा बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. सुमारे महिनाभर ती तुरुंगात राहिली. त्यानंतर तिला जामीन मिळाला पण त्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.