cover song of “Swapna Sundari” features melodious voice of trendsetting singer Abhijeet Sawant : मराठी इंडस्ट्रीत सध्या नवनवीन कथा बघायला मिळतात एकीकडे बॉक्स ऑफिसवरवर हाऊसफुल्ल होणारे मराठी चित्रपट तर दुसरीकडे चित्रपटाच्या टाइटल गाण्याची होणारी चर्चा हे समीकरण सध्या बघायला मिळतंय. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतोय पण लक्षात राहतात ती चित्रपटाची गाणी ! गेली दोन दशकं मराठी सोबत बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत असलेला गायक अभिजीत सावंत देखील या गाण्याचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय.
मंगल अष्टका वन्स मोर मधलं “सर सुखाची श्रावणी” असो ते आता प्रदर्शित झालेला “सखे गं साजणी” चित्रपटाचं कव्हर साँग या दोन्ही गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिजीतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना चित्रपटात पुन्हा एकदा अनुभवयाला मिळणार असून आगामी ” स्वप्न सुंदरी” चित्रपटासाठी त्याने कव्हर साँग केलं असल्याचं कळतंय.
पवनराजे निंबाळकर थरारक हत्या प्रकरणाचा आज निकाल, 20 वर्षांनंतर ओमराजेंच्या वडिलांना न्याय मिळणार?
इंडियन आयडॉल पासून सुरु झालेला प्रवास ते पुढे अगणित गाण्याचा महत्त्वपूर्ण भाग होणं असू दे अभिजीत ने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. गायक ते बिग बॉसचा प्रवास आणि रियालिटी शो मध्ये असलेला त्याचा वावर हा कायम चर्चेत तर राहिला पण त्याच सोबतीने आजही प्रेक्षकांच्या ओठावर अभिजीत ची गाणी कायम असतात हे ही खरचं !
या सगळ्या अफवाच! संपूर्ण खासदार ठाकरेंसोबतच…, राऊतांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या
गाण्याचे रियालिटी शो असो किंवा चित्रपटाच्या टाइटल गाण्याचा प्रवास या बद्दल बोलताना अभिजीत सांगतो ” माझ्या गाण्याची सुरुवात एका रियालिटी शो मधून झाली आणि आज या गाण्याचा अविरत प्रवास हा वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट सोबत सुरू आहे याचा खूप आनंद आहे. कधीतरी गाण्यात सुद्धा अभिणायची भूमिका करायला मिळते आणि मग बोनस पॉइंट मिळाला की काय असं वाटून जात पण चित्रपटाच्या गाण्याची प्रोसेस ही खूप उत्सुकतेची असते कारण त्या चित्रपटाच्या हीरोला दिलेला तो एक आवाज असतो अस मला वाटतं. चित्रपटाच्या निमित्ताने कव्हर साँग करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी देखील प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवून जाणारा असतो मग त्या चित्रपटाच्या भूमिका देखील या आपल्या आहेत हे लक्षात ठेवून गाणं करावं लागतं. आजच्या तरुण पिढीला भावणारा त्यांचा ट्रेंड प्रमाणे काहीतरी वेगळं करण्याकडे देखील माझा कल असतो आणि हे यामुळे शक्य होत. लवकरच “स्वप्नसुंदरी” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि प्रेक्षक त्याला नेहमीप्रमाणे खूप प्रेम देतील ही आशा आहे”
महागाईचा मारा सुरूच! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोल-डिझेलही महागणार?
जगभरात अभिजीतच्या आवाजाची आज देखील तितकीच क्रेझ बघायला मिळते आणि भविष्यात देखील अभिजीत अजून वेगवेगळ्या उत्तम गाण्याचा भाग होऊन प्रेक्षकांना सांगतिक पर्वणी अनुभवण्याची संधी देईल यात शंका नाही.
