Download App

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचं उद्घाटन! संत तुकाराम चित्रपटाचे खास प्रदर्शन

DadaSaheb Phalake Chitrapat Rasaswad Mandal चे उद्घाटन होणार आहे. यात 1936 चा संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.

  • Written By: Last Updated:

DadaSaheb Phalake Chitrapat Rasaswad Mandal Inauguration Sant Tukaram film will show : सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ.

ज्यावर गर्व करावा त्यावर वाद नको! माधुरी हत्तीण प्रकरणी वनताराविरोधात याचिका, सुप्रीम कोर्टाने फटकरलं…

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी, 17 सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रभात फिल्म कंपनी निर्मित संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. हा उपक्रम पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात पार पडणार असून दुपारी 3 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

भारत-अमेरिका व्यापार संबंध सुधारणार? टॅरिफ युद्धानंतर ट्रम्प यांचा खास अधिकारी भारतात

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यामागे प्रमुख उद्देश हा दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आहे. जुन्या काळातील गाजलेले आणि ऐतिहासिक महत्त्वाचे चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले.

वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू

उद्घाटनाच्या सोहळ्यात दाखविण्यात येणारा संत तुकाराम हा प्रभात कंपनीने 1936 साली निर्मित केलेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. दिग्दर्शक विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल यांनी याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर जागतिक पातळीवरही लौकिक मिळवला. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाची झलक अनुभवता येणार आहे.

वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. चित्रपट प्रदर्शन किंवा उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक प्रेक्षकांनी ९७०२२७०८२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

follow us