Superstar Rajesh Khanna : सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांचा आज स्मृती दिन आहे. 18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या अदांनी सिनेरसिकांच्या मनावर राजेश खन्ना यांनी राज्य केलं. (Rajesh) त्यावेळी तरुणाईवर त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्ना यांचा सिनेमा म्हटलं की काही क्षणात तिकीटांची विक्री व्हायची. राजेश खन्ना यांचं मराठीशी खास नातं होतं.
सुपरस्टार राजेश अमृतसर ( पंजाब) वरुन मुंबईत आल्यावर मराठमोळ्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरील सरस्वती निवासमधील आपल्या काकांकडे राह्यचा. आजही तेथे चुन्नीलाल खन्ना ( रेल्वे कॉन्ट्रॅक्टर) हा फलक पाह्यला मिळतोय. मराठमोळ्या गिरगावात राहिल्याने राजेश खन्नाचे मराठी अतिशय उत्तम होते. त्याच्या खार येथील कार्यालयात मराठी वृत्तपत्र आणि साप्ताहिक पाह्यला मिळत.
सुपर डान्सर चॅप्टर 5 या5 कारणांसाठी शो बघितलाच पाहिजे
सत्तरच्या दशकात शिवसेना वर्धापनदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि राजेश खन्ना व्यासपीठावर एकत्र पाह्यला मिळाले. कालांतराने राजेश खन्नाने मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचा फोटो सामना वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर प्रसिद्ध झाला. आजही गिरगावातील सरस्वती निवास येथे राजेश खन्नाच्या नावाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. दहीहंडी उभारली जाते.
राजेश खन्नाने मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याचा योग आला आहे. श्री मंगेश चित्र या बॅनरखालील प्रभाकर निकळंकर आणि नारायण गुजर निर्मित व प्रभाकर निकळंकर दिग्दर्शित ” सुंदरा सातारकर ” ( १९८१) या चित्रपटात राजेश खन्नाने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारली. मेहबूब स्टुडिओत या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, रमेश भाटकर, सुहास भालेकर, बाळ कर्वे, दाजी भाडवडेकर, वसंत इंगळे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.
राजेश खन्नाची भूमिका असलेला शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना ‘( १९६९) गिरगावातील रॉक्सी थिएटरमध्ये रिलीज झाला तोच सुपर हिट ठरला आणि काही आठवड्यातच राजेश खन्नाने गिरगाव सोडले आणि तो वांद्र्याच्या कार्टर रोडवर “आशीर्वाद ” बंगल्यात राह्यला गेला. पूर्वी मराठमोळ्या गिरगावात राहिल्याने राजेश खन्ना चांगले मराठी बोलायचा. त्याच्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्याला भेटायला आलेल्या महाराष्ट्रीय मीडियाशी तो आवर्जून मराठीत बोलायचा.