बॉलिवूडच्या ‘काकां’चाही करिश्मा फेल; गांधीनगरचा ‘भगवा’ किल्ला अभेद्यच!

बॉलिवूडच्या ‘काकां’चाही करिश्मा फेल; गांधीनगरचा ‘भगवा’ किल्ला अभेद्यच!

Gandhinagar Lok Sabha Constituency : गुजरात भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत. गांधीनगर हा मतदारसंघही (Gandhinagar Lok Sabha) त्यातलाच. याच मतदारसंघातून कधीकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे दिग्गज नेते लोकसभेत पोहोचले. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या (Amit Shah) मतदारसंघाचे खासदार आहेत. आताही त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या मतदारसंघात भाजपला बेदखल करण्यासाठी काँग्रेसने अनेक (Congress Party) वेळा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. 1996 च्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी विजयी झाले होते. यानंतर ज्यावेळी त्यांनी हा मतदारसंघ सोडला त्यावेळी काँग्रेसने मोठा डाव खेळत बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना अर्थात काका यांना (Rajesh Khanna) तिकीट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..

1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गांधीनगर मतदारसंघात 1 लाख 88 हजार 872 मतांनी विजय नोंदवला होता. त्यावेळी काँग्रेसकडे कोणताच करिश्माई नेता नव्हता जो या भगव्या किल्ल्यात भाजपला टक्कर देऊ शकेल. अशा परिस्थितीत अभिनेते राजेश खन्ना काँग्रेसच्या दृष्टीने प्रथम प्राधान्य होते. याचं कारण म्हणजे त्यावेळी राजेश खन्ना यांची लोकप्रियता प्रचंड होती आणि महत्वाचे म्हणजे ते गुजरातचे जावई होते.

अभिनेत्री डिंपल कपाडियाबरोबर लग्न केल्याने त्यांचे गुजरातशी खास कनेक्शन होते. ज्यावेळी भाजपने विजय पटेल यांना उमेदवारी दिली त्यावेळी काँग्रेस नेत्यांना वाटले ही यंदा निवडणुकीचे निकाल निश्चितच धक्कादायक असतील.

अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर कुणाला तिकीट द्यावं असा मोठा प्रश्न भाजप नेत्यांसमोर होता. तेव्हा भाजपने गुजरातचे मातब्बर नेते हरिश्चंद्र पटेल यांचे पुत्र विजय पटेल यांना मैदानात उतरवले. भाजपला आपली व्होट बँक आणि हरिश्चंद्र पटेल यांच्या इमेजवर विश्वास होता तर काँग्रेसची राजेश खन्ना यांच्या ग्लॅमरवर भिस्त होती. पोटनिवडणूक असतानाही या मतदारसंघाची देशभरात चर्चा झाली होती.

Gujarat Drugs : गुजरात पोलिसांची मोठी कारवाई; 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त

विजय यांनीच मिळवला विजय

ज्यावेळी या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला. 36 वर्षांच्या विजय पटेल यांनी बॉलीवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांचा पराभव केला होता. राजेश खन्ना यांना 1 लाख 97 हजार 425 मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला काही स्ट्रॅटेजीचा फायदा झाला परंतु त्यांना राजेश खन्ना यांचा पराभव रोखता आला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube