सुपर डान्सर चॅप्टर 5 ; ‘या’ 5 कारणांसाठी शो बघितलाच पाहिजे

सुपर डान्सर चॅप्टर 5 ; ‘या’ 5 कारणांसाठी शो बघितलाच पाहिजे

Why You Should Watch Show Super Dancer Chapter 5 : मंच सजला आहे, प्रकाशझोत टाकला आहे आणि देशातील काही अत्यंत गुणी, छोटे उस्ताद आपल्या डान्सने मंच दणाणून सोडण्यासाठी सरसावले आहेत. सुपर डान्सर चॅप्टर 5 (Super Dancer Chapter 5) यावेळी नव्या दमाच्या प्रतिभावंतांना घेऊन येत आहे. अधिक मनोरंजन आणि अधिक हृदयस्पर्शी क्षण घेऊन. तुमच्या आवर्जून बघण्याच्या कार्यक्रमांच्या यादीत या शोला अग्रस्थान का असले (Entertainment News) पाहिजे, हे जाणून घ्या या कारणांमधून.

1. इंटरनेट स्टार्सपासून राष्ट्रीय सुपरस्टार्सपर्यंत: या सीझनमध्ये असे डान्सर सहभागी झाले आहेत, ज्यांनी आपल्या डान्स व्हिडिओजच्या माध्यमातून आधीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंटरनेटवर धमाल उडवून देणारे हे छोटे उस्ताद आता भारताच्या सर्वात मोठ्या डान्सच्या मंचावर येऊन स्वतःला सुपरस्टार सिद्ध करण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. ‘इंटरनेटने ज्यांना बनवले स्टार त्यांना हा मंच बनवेल आता सुपरस्टार’ असे थीम असलेला हा शो नक्कीच प्रगती, जिद्द आणि कौशल्य यांचा प्रवास असेल.

2. कलाकारांच्या मातेला मनःपूर्वक सलाम: चमक आणि ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन हा शो छोट्या डान्सर्सचा आधार बनणाऱ्या त्यांच्या मातेचा देखील सन्मान करणार आहे. त्यामुळे हा सीझन अशा मातांचाही गुणगौरव करेल, ज्यांनी आपल्या मुलामधील डान्सची रुची ओळखून, ती विकसित करण्यासाठी, आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी बलिदान दिले. निःस्वार्थ प्रेमाच्या आणि भक्कम आधाराच्या हृदयस्पर्शी कहाण्या ऐकण्यासाठी सज्ज व्हा.

विधानभवनातला ‘पास घोटाळा’! 5 ते 10 हजारांमध्ये प्रवेश, आमदारांनी रेट कार्ड आणि ठिकाणही सांगितलं

3. 4 वर्षांनंतर धडाक्यात पुनरागमन: होय, आता प्रतीक्षा संपली आहे. मागील चार सीझन्समध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवल्यानंतर सुपर डान्सर हा शो आता नव्या दमाच्या प्रतिभेला घेऊन येत आहे, नव्या भावना आणि दमदार परफॉर्मन्ससह! डान्सर्सच्या उगवत्या पिढीसाठी मंच खुला करण्याची परंपरा या शो ने चालू ठेवली आहे.

4. आपले अनुभवी आणि लोकप्रिय परीक्षक परतून येत आहेत – नवीन उत्साहात: लोकांची आवडती शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर पुन्हा परीक्षक म्हणून येत आहेत आणि आपल्यासोबत आपली खास शैली, जादू, मार्गदर्शक सूचना आणि मस्ती घेऊन येत आहेत. या दोघी सीझन 1 पासून या कार्यक्रमाशी निगडित आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असेल मर्झी पेस्तनजी, जो परीक्षकांच्या त्रिकूटात एक नवीन ट्विस्ट घेऊन येईल. प्रेक्षक उत्तम मार्गदर्शन, प्रतिसाद आणि मनोरंजक संभाषणाचा आस्वाद घेऊ शकतील.

Video : टकले पडळकरांचा मावस भाऊ तर, देशमुख…; आव्हाड-पडळकरांच्या राडा अहवालात काय काय?

5. डान्सचे वैविध्य आणि प्रतिभेतील गोडवा: फ्री-स्टाइलपासून हिप-हॉपपर्यंत आणि बॉलीवूड, शास्त्रीय आणि अनेक डान्स प्रकार एकाच छताखाली बघायला मिळणार आहेत. या मुलांची असामान्य प्रतिभा, त्यांचा आत्मविश्वास आणि गोडवा यांचे लोभस मिश्रण प्रेक्षक बघतील. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर समस्त कुटुंबासाठी विविध डान्स प्रकारांचा एक मनोरंजक उत्सव आहे.

बघा, सुपर डान्सर चॅप्टर 5, सुरू होत आहे 19 जुलैपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube