Gautami Patil : प्रसिद्धी, लोकप्रियता अन् ट्रोलिंग…गौतमी पाटीलचं खास शैलीत ट्रोलर्सला उत्तर

'द महाराष्ट्र फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने लेट्सअप मराठी दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने ट्रोलर्सला वेगळ्या अंदाजात उत्तर दिलंय.

gautami patil

gautami patil

Gautami Patil : अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलकडून (Gautami Patil) लवकरच तिच्या फॅन्सला मोठं गिफ्ट मिळणार आहे. लवकरच ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटात गौतमी थिरकताना दिसणार आहे. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने घेतलेल्या खास मुलाखतीत गौतमी पाटीलने संघर्ष, ट्रोलिंग मिळालेल्या यशावर पहिल्यांदाच मनमोकळ्यापणाने भाष्य केलंय. मागील काही दिवसांत गौतमी पाटील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत होती. कोणी भरभरुन प्रेम देत होते, तर कोणी ट्रोलिंग करीत असत. अशातच काही नृत्यांगणांकडूनही गौतमी पाटीलवर टीका-टिप्पणी करण्यात आली. या ट्रोल करणाऱ्या नृत्यांगणांना गौतमी पाटीलने खास शैलीत अॅक्टिंग करतच उत्तर दिलंय.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव

मुलाखतीत गौतमी पाटीलला ट्रोलर्सबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर गौतमी पाटीलने स्मित हास्य करत हात आडवा फिरवून ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलंय. त्यामुळे गौतमी पाटीलने जाणून बुजून टीकाकारांवर बोलणं टाळल्याचं दिसून आलंय. अर्थात टीका-टिप्पणी आणि ट्रोल करणाऱ्या नृत्यांगणांच्या टीकेवर बोलण्यास गौतमीने नकार दिला आहे. गौतमीला मिळत असलेल्या यशामुळे तिला ट्रोल केलं जात असल्याचं तिच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसून आलंय.

पुढे बोलताना गौतमी म्हणाली, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटातील हिंदी गाण्यात मला संधी दिलीयं. या गाण्यामध्ये नवीन गोष्टी नव्या स्टेप्स करण्यास मिळाल्या. पुढे जात असताना मी कधी मागे वळून अजिबात बघत नाही, मी पुढे चालले तर पुढेच बघत आहे. खरी गौतमी आता बाहेर निघाली जी बसलेली होती. मी आधी घाबरुन जगत होती, लोकं काय बोलतील? याचा विचार करायचे पण आता मला मी बेस्ट वाटते असून मी आता खंबीर आहे, या सर्व गोष्टींची सवय झाली असल्याचं गौतमी पाटीलने स्पष्ट केलंय.

Fuel Saving Tips : गगनाल्या भिडणाऱ्या किमतीत पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या खास TIPS

लाईव्ह परफॉर्मस माझा जीव की प्राण…
गौतमी पाटीलने आपल्या प्रवासाविषयी बोलताना स्टेजवर डान्स सादर करतानाचा अनुभव शेअर केलायं. गौतमी म्हणाली, स्टेजच्या वर गेले की माझा विषय संपला, मी एकच बघते ते फक्त प्रेक्षक आणि मी बाकी मला काही कळत नाही. मी त्यांच्यात तल्लीन होऊन जाते, प्रेक्षकांमुळेच ही ताकद मला मिळत असल्याचं गौतमी पाटीलने स्पष्ट केलंय.

चित्रपससृष्टी माझ्यासाठी नवीन आहे, चित्रपटसृष्टीतील कलाकार समजून घेतात. सिद्धार्थदादाला मी आवर्जून सिद्धार्थदादा म्हणते. मंगेशदादांनीही मला सपोर्ट केला. ते मला म्हणाले की तू बोल, तू चुकली की आम्ही बोलतो. हे सांभाळून घेणं गरजेचं असतं. मराठी कलाकार खूप चांगले असल्याचंही गौतमीने सांगितलं.

Exit mobile version