Fuel Saving Tips : गगनाल्या भिडणाऱ्या किमतीत पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या खास TIPS

Fuel Saving Tips अमेरिका-इराण संघर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे मग, रोजच्या धावपळीत इंधन वाचवायचं कसं?

  • Written By: Published:
Fuel Saving Tips : गगनाल्या भिडणाऱ्या किमतीत पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या खास TIPS

Fuel Saving Tips : अमेरिका-इराण संघर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या दरांनी आभाळ गाठलेलं असताना रोजच्या धावपळीत नेमकं इंधन वाचवायचं कसं याबद्दल काही खास टिप्स आहेत. ज्यांच्या आधारे तुम्ही अंदाजे 10 ते 25 टक्के इंधनाची बचत करू शकता. यामुळे केवळ खर्चच कमी होत नाही, तर प्रदूषण कमी होण्यासही मदत होते आणि वाहनांचे आयुष्यही वाढते. नेमकं कसं वाचावायचं इंधन त्याबद्दल जाणून घेऊया..

पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याच्या युक्त्या

अतिवेग आणि अचानक ब्रेक लावल्याने इंधनाचा वापर वाढतो. त्यामुळे चांगल्या मायलेजसाठी, तज्ज्ञ स्थिर आणि नियंत्रित गतीने गाडी चालवण्याची शिफारस करतात. यासोबतच टायरमधील हवेचा दाब कमी असल्यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि इंधनाची बचत कमी होते. त्यामुळे दर आठवड्याला टायरमधील हवेचा दाब तपासल्याने इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.

इंजिन विनाकारण चालू ठेवू नका

वाहतूक कोंडीत जास्त वेळ थांबल्यास किंवा सिग्नलवर थांबल्यास इंजिन बंद करा. जर तुम्हाला 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असेल, तर इंजिन बंद केल्याने इंधनाची बचत होते आणि प्रदूषणही कमी होते. नियमित सर्व्हिसिंगच्या अभावामुळे मायलेज कमी होऊ शकते. खराब एअर फिल्टर, जुने इंजिन ऑइल किंवा सदोष स्पार्क प्लगमुळे इंधनाचा वापर वाढू शकतो. त्यासाठी वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने वाहनाची कार्यक्षमता आणि इंधन बचत या दोन्हीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

योग्य गिअरमध्ये गाडी चालवा

तुमच्या वाहनातील अनावश्यक वजनामुळे इंजिनवर ताण येतो आणि इंधनाचा वापर वाढतो. चांगल्या मायलेजसाठी, फक्त आवश्यक वस्तूंसह प्रवास करा. तुमच्या गाडीच्या वेगासाठी योग्य गिअर वापरणे महत्त्वाचे आहे. चुकीचा गिअर वापरल्याने इंधनाचा वापर वाढतो आणि इंजिनचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे गाडीच्या वेगानुसार योग्य गिअरमध्ये गाडी चालवण्यास प्राधान्य द्या.

क्लचवर पाय ठेवू नका

क्लच दाबून ठेवल्याने इंधन वाया जाते आणि क्लच प्लेट्सचे नुकसान होते. चालकांनी ही सवय ताबडतोब सोडावी. त्याशिवाय कारमधील एसी सतत जास्त वेगाने चालवल्याने मायलेज कमी होते. त्यासाठी फक्त आवश्यक असेल तेव्हाच एसी वापरा आणि शक्य असेल तेव्हा ताजी हवा घ्या. शक्य असेल तेव्हा, कमी रहदारीचे मार्ग निवडा. वारंवार थांबणे आणि इंजिन सुरू करावे लागल्याने इंधनाचा वापर वाढतो. नेहमी नामांकित पेट्रोल पंपावरूनच गाडीत इंधन भरा. निकृष्ट दर्जाच्या इंधनामुळे इंजिनचे नुकसान होऊ शकते आणि मायलेज कमी होऊ शकतो. दररोज गाडी चालवण्यापूर्वी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास दर महिन्याला बऱ्यापैकी पैशांची बचत करू शकता.

follow us