Download App

Dawood Ibrahim : कलाकारांना धमक्या ते बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर? असं होतं दाऊदचं बॉलिवूड कनेक्शन…

  • Written By: Last Updated:

Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्याप पुष्टी झालेली नाही. भारतासह अनेक देश दाऊदचा शोध घेत आहेत. याच दाऊदशी भारतीय चित्रपट म्हणजे बॉलिवूडशी खास कनेक्शन होत. काय आहे हे कनेक्शन पाहूयात…

कलाकारांना धमक्या ते बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर?

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना येणाऱ्या धमक्या इथपासून ते थेट बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअरपर्यंत दाऊदचं हे बॉलिवूड कनेक्शन पोहचलेलं आहे. यामध्ये पहिलं नाव येत ते ‘राम तेरी गंगा मैली’ या राज कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनी हीचं. कारण या चित्रपटामुळेच मंदाकिनी प्रसिद्धीच्या झोतात आली. चित्रपटातील राजीव कपूर यांच्यापेक्षा जास्त चर्चा झाल्या होत्या त्या मंदाकीनी यांच्या याच चर्चांदरम्यान मंदाकिनी परदेशात जाऊन पोहचली. त्यावेळी दाऊदची नदर तिच्यावर पडली. त्यानंतर मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांचं अफेअर असल्याचंही बोललं गेलं. कारण दुबईतील शारजाहमध्ये मंदाकिनी आणि दाऊद यांच्या शेजारी बसून क्रिकेट सामना पाहिल्याचा फोटो व्हायरलं झाला होता.

Shah Rukh Khan: किंग खानच्या ‘डंकी’ला सेन्सॉरकडून मिळालं U/A सर्टिफिकेट; किती तासांचा असणार चित्रपट?

मात्र यामुळे तिचं करिअर धोक्यात आलं होतं. अशा देखील चर्चा त्यावेळी होत्या की, दाऊद निर्मात्यांना मंदाकिनीला चित्रपटांमध्ये घेण्यासाठी धमक्या देत होता. मात्र या अफेअरच्या चर्चांमुळे मंदाकिनीच्या फिल्मी करीअरला ब्रेक लागला. त्यानंतर तिने कॅग्युर टी रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केलं. तिला तीन मुलं आहेत.

‘तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?’ विनोद तावडेंचं सूचक विधान

मंदाकिनीच नाही तर प्रसिद्ध दिलीप कुमार यांच्या एका बहिणीचे लग्न दाऊद इब्राहिमचा मेंटॉर आणि वॉन्टेड क्रिमिनल असणाऱ्या रशिद अरबा याच्याशी झालेलं होतं. तर अभिनेता संजय दत्त याला 1994 साली जेलमध्ये जावं लागलं होतं. ज्याचं कनेक्शन 1993 च्या मुंबई ब्लास्टशी होतं. त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की, दाऊदचा जवळचा व्यक्ती असलेल्या अबू सालेम संजय दत्तच्या घरी आला होता. त्याने संजयच्या घरी बंदूक लपवल्या होत्या. तसेच मुंबई पोलिसांसमोर संजय दत्तने कबूल देखील केलं होतं की, प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांनी दुबईमध्ये एका पार्टीत जाऊदची त्याच्याशी भेट घालून दिली होती.

दाऊदवर विषप्रयोग! डोंगरीच्या गल्लीतून ‘पाकिस्तानात’ कसा गेला अंडरवर्ल्ड डॉन?

त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी 2004 मध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी अभिनेता गोविंदाला दाऊद इब्राहिम ने मदत केली होती असा आरोप केला होता. त्यानंतर मुकेश भट, बोनी कपूर, राकेश रोशन यांसारख्या अनेक चित्रपट निर्मात्यांना चित्रपटांचा प्रॉफिट शेअर करण्यासाठी धमकीचे फोन येत होते. त्यामध्ये 2001 मध्ये राकेश रोशन यांच्या मुंबईतील ऑफिस बाहेर त्यांच्या हत्येचा देखील प्रयत्न झाला होता. यामागे असे देखील सांगण्यात येत होतं की, कहो ना प्यार है या चित्रपटाचे प्रॉफिट शेअर करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळेच हा हल्ला झाला. त्यानंतर अभिनेता रितिक रोशन ला देखील पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं.

दाऊदच्या गुन्ह्यांबद्दल सांगायचं झालं तर मुंबईत 1993 साली घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद मुख्य सूत्रधार होता. या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणा त्याच्या शोधात होत्या. मुंबईतील बॉम्बस्फोटात 250 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दहशतवादी कारवायांबद्दल बोलायचे झाल्यास दाऊदचे अल कायदा आणि लष्करसोबतचे संबंधही समोर आले होते. तसेच खंडणीच्या नवीन पद्धती, टार्गेट किलिंग, अंमली पदार्थांची तस्करी यासाठी देखील कुप्रसिद्ध आहे.

Tags

follow us