Download App

भारतात लोकशाही धोक्यात; राहुल गांधींच्या वक्तव्यावर अभिनेता म्हणाला, ‘खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस’

  • Written By: Last Updated:

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University केलेले भाषण चर्चेचा विषय बनले आहे. पेगाससच्या माध्यमातून त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती स्वत: खुद्द गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी विद्यापीठातील भाषणात भारतातील लोकशाही धोक्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे लोकशाहीची पाया नष्ट त्यांचाच एक अजेंडा संपूर्ण देशावर थोपवू पाहात आहेत, असं वक्तव्य केलं. दरम्यान, राहुल गांधींच्या या भाषणावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या देशाचा अपमान केल्याचं भाजप नेते म्हणत आहेत. आता मराठी अभिनेत्यानेही राहुल गांधींच्या भाषणाबद्दल ट्वीट केलं आहे.

राहुल गांधी होते की, भारतातील विरोधी पक्षांच्या लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले जात आहे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. विरोधकांवर चुकीचे गुन्हे दाखल होत असल्याने आम्ही सर्वजण सतत दबाव अनुभवत आहे. कोणतेही कारण नसताना माझ्यावर देखील गुन्हे दाखल केले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षातील नेत्यांना ज्याप्रकरे फसवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे भारतात लोकशाही धोक्यात आसल्याचे मोठे उदाहरण आहे. मीडिया आणि लोकशाही संरचनेवर हल्ले होत आहेत, त्यामुळे लोकांशी मुक्तपणे संवाद करणे देखील कठीण झाले असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर आता अभिनेता आरोह वेलनकर याने आपली प्रतिक्रिया दिली.

आरोहने राहुल गांधींच्या भाषणासंदर्भातील एएनआयचं ट्वीट त्याच्या अकाऊंटवरुन रिट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राहुल गांधींचा खोटारडा माणूस म्हणून उल्लेख केला आहे. ‘खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस’ असं म्हणत आरोहने रागाचे इमोजी पोस्ट केले आहेत. राहुल गांधींबाबत आरोहने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. आरोह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो परखडपणे मत व्यक्त करताना दिसतो.

Amol Kolhe : ‘बेळगाव’चा ‘बेळगावी’ असा उल्लेख, सीमाभागातील मराठी लोक आक्रमक

 

 

 

Tags

follow us