Dhamaal 4 साठी मंगळवार ठरला दमदार! पाचव्या दिवशी कमाई 86.02 कोटी रुपयांवर

Dhamaal 4 : 'धमाल 4' ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. शानदार वीकेंड आणि सोमवारी मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर, या चित्रपटाने बॉक्स

Dhamaal 4

Dhamaal 4

Dhamaal 4 : ‘धमाल 4’ ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. शानदार वीकेंड आणि सोमवारी मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी आणखी मोठी कमाई केली आहे. ‘नो तिकीट ऑफर’चा (मोफत तिकीट ऑफर) निर्मात्यांना नक्कीच फायदा झाला असून, पाचव्या दिवशी 9.90 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने आपली पकड मजबूत ठेवली आहे. यामुळे दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा सहज ओलांडण्याच्या मार्गावर आहे.

Dhamaal 4 ची कमाई

शुक्रवार – 15.50 कोटी रुपये
शनिवार – 23.31 कोटी रुपये
रविवार – 28.40 कोटी रुपये
सोमवार – 8.91 कोटी रुपये
मंगळवार – 9.90 कोटी रुपये

एकूण – 86.02 कोटी रुपये

हास्य-विनोद, धम्माल-मस्ती आणि खजिन्याचा थरारक शोध, तसेच कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे आकर्षित करत आहे. ‘धमाल 4’ हे गुलशन कुमार आणि टी-सीरीज (T-Series) द्वारे सादर केले गेले असून, यात देवगण फिल्म्स (Devgn Films), टी-सीरीज फिल्म्स, मारुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज (Panorama Studios) यांचा सहभाग आहे.

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? खासदार सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील

‘धमाल 4’चे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे, तर अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी याची निर्मिती केली आहे. ‘धमाल 4’ आता तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये यशस्वीरीत्या प्रदर्शित आहे.

Exit mobile version