Mangesh Desai : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा सिनेमा गतवर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता धर्मवीर २ सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता लागली. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलंय. लवकरच धर्मवीर २ प्रदर्शित होईल. दरम्यान, लेट्सअप मराठीशी बोलतांना निर्मिते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Nitesh Rane : …तर चून-चून के मारेंगे; नितेश राणेंची नगरमध्ये खुलेआम धमकी
मंगेश देसाई म्हणाले की, जनसेवा केश कर्तनालयातच दिघे साहेब आपली दाढी-कटींग करायचे. त्या कर्तनालयासमोर एक खड्डा होता. तो खड्डा आजही आहे. मध्यंतरी रस्ता रुंदी करणामध्ये हा खड्डा बुजवला गेल्या होता. त्यामुळं लोकांना कर्तनालयात जायला अडचणी येत होत्या. हे दिघे साहेबांच्या लक्षात आल्यावर त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. तिथले अधिकारी आल्यावर तुझी हेअर स्टाईल बदलूया, असं दिघे साहेब म्हणाले. तर तो अधिकारी नाही म्हणाला. मात्र, दिघे साहेब त्याला जनसेवा कर्तनालयता घेऊन गेलं. कर्तनालयाचा दरवाजा पूर्ण उघडल्या जात नव्हता आणि अधिकाऱ्याला कर्तनालयात जात येत नव्हतं. तेव्हा दिघे साहेब त्या अधिकाऱ्याला म्हणाले, तो दरवाजा अडणार हे माहित असतांनाही तुम्ही त्याला त्रास देतोय… त्याचा धंदा बुडवताय.. तुम्ही रस्त्यावरचा खुड्डा बुजवला, पण केश कर्तनालयात काम करणाऱ्यांच्या आयुष्याच्या खड्डायचं काय करणार? उद्यापासून तो खड्डा जसाच्या तसा व्हायला हवा. तेव्हापासून तो खड्डा तसाच आहे. इतकी त्यांची जनतेची नाळ जोडलेली होती, असं असं देसाई म्हणाले.
Sai Tamhankar : सिंपल पण तितकीच सुंदर… सईच्या हटके फोटोंवर चाहते फिदा…
आजही धर्मवारी १ रिलीज झाला तेव्हा अनेकांनी माझ्याकडे येऊन त्यांचे किस्से मला सांगितले. आभाळाएवढं कर्तुत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या एका भागात दाखवणे शक्य नाही. २४ तासांपैकी २१ तास काम करणारा आणि तीनच तास झोपणारे दिघे साहेब खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असं देसाई म्हणाले.
दिघे साहेब एकदा बोलेरोतून जात असतांना आम्ही त्यांच्या गाडीमागे धावत होता. तेव्हाते गाडीतून उतरले आणि मागे वळून पाहिलं. मला बोलावून घेतलं. माझ्या खांद्यावर हात टाकून माझी विचारपूस केली. तेव्हा त्यांच्यासोबत गोल्डस्पॉट प्यायलो ते गोल्डस्पॉट नव्हतं. तर ते अमृत होतं, असं देसाई म्हणाले.
आनंदाआश्रम पर्यंत येण्याचा माझा प्रवास एकनाथ शिंदे आमदार झाले तेव्हा पूर्ण झाला. दिघे साहेबांना भेटायला दूरदूरून लोक यायचे. माणसं तेव्हा जोडली जातात, जेव्हा तो मित्र होता. गुरू होता, सखा होतो. दिघे साहेब माझे गुरू आहेत, असं देसाई म्हणाले.