Muktaai Movie New Poster Release: संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे (Muktaai Movie) छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.
‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेली दिव्य मुक्ताई दिसून येत आहे. जून 2024 मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.
आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली. केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या आगामी ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात
स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशा या ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आगामी ‘मुक्ताई’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘शिवराज अष्टका’तील सिनेमाना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहेत. ‘मुक्ताई’ सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.