Download App

Govinda : तब्बल 5 वर्षांनंतर अभिनेत्याचं चित्रपटात कमबॅक, दिसणार ‘या’ भूमिकेत

Govinda : 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडतसेच लोकांच्या मनावर राज्य करणारा गोविंदा जवळपास 5 वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही.

Anees Bazme On Govinda : 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूड (Bollywood) तसेच लोकांच्या मनावर राज्य करणारा गोविंदा (Govinda ) जवळपास 5 वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘रंगीला राजा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. हा चित्रपट खूपच घटक ठरला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर (box office) केवळ 34 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. आजही गोविंदाची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. जर तो चित्रपटांमध्ये परतला तर त्याच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी असणार आहे. चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मीने (Anees Bazmee) त्याच्या पुनरागमनाबद्दल वक्तव्य केले आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनीसने गोविंदाला कॉमेडी किंग म्हटले आहे, म्हणाला की, “तो एक उत्तम अभिनेता आहे. ज्या प्रकारची कॉमेडी तो करू शकतो तसा कोणी करू शकत नाही. मी त्यांच्यासोबत ‘आँखे’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना मस्ताना’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सर्व यशस्वी झाले. त्याचे कॉमिक टायमिंग अतुलनीय आहे. ‘राजा बाबू’मध्ये त्याने चमकदार काम केले. मी त्याच्यासाठी अनेक चित्रपट लिहिले आहेत आणि त्या सर्वांनी चांगले काम केले आहे. वैयक्तिकरित्या, माझा विश्वास आहे की तो एक महान अभिनेता आहे.

गोविंदाच्या पुनरागमनावर अनीस बज्मी काय म्हणाले?

मुलाखतीत अनीसला विचारण्यात आले की, तो पात्र असूनही त्याला पुनरागमन करण्यापासून रोखणारी कोणती गोष्ट आहे? या प्रश्नाचे उत्तर नव्हते, पण अनीस म्हणाला की, “फक्त मीच नाही, इतर अनेक लोक आहेत ज्यांना त्याच्यासोबत काम करायचे आहे. आणि ज्या दिवशी मला हे करण्याची संधी मिळेल, जेव्हा मला वाटेल की हो, हा एक खास चित्रपट आहे, एक विशेष भूमिका असल्यास, जी गोविंदाजींनी करायला हवी, तेव्हा मला त्यांच्याकडे जाण्यास आनंद होणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

‘TMKOC’ मधील लोकप्रिय अभिनेता रोशनसिंग सोधी 4 दिवसांपासून बेपत्ता, वडिल म्हणाले, ‘तो….’

अनीस पुढे म्हणाला की, “आम्ही इतके दिवस एकमेकांसोबत काम करत आहोत की जर काही खास लिहिले आणि त्यांनी ते केले तर खूप छान होईल. तो पात्र पूर्णपणे उंचावेल, असे वक्तव्य दिग्दर्शकांनी सांगितले आहे.

follow us