Govinda: 1 हजार कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात नाव आल्यावर गोविंदाकडून खुलासा; म्हणाला… 

Govinda: 1 हजार कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात नाव आल्यावर गोविंदाकडून खुलासा; म्हणाला… 

Govinda: १ हजार कोटी रुपयांच्या ऑनलाइन पाँझी घोटाळ्याविषयी (PONZI SCAM CASE) अभिनेता गोविंदाचं नाव समोर आलं होतं. तसेच गोविंदाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या (CRIME) अधिकाऱ्यांनी दिल्याचे पाहिले आहे. सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पाँझी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गोविंदाने कथितरित्या प्रमोशन आणि समर्थन केल्याचे, असं अधिकाऱ्यांनी माहिती दिल आहे. यावर आता गोविंदाकडून याबाबत खुलासा देण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)


गोविंदाच्या मॅनेजरने हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार माध्यमात प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही पूर्ण तथ्य नाही आणि अभिनेत्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. यावर सिन्हा म्हणाले आहे की, ‘गोविंदाचा या प्रकरणाशी काही देखील संबंध नाही. गोविंदा एका एजन्सीमार्फत एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि परत आले होते. त्यांचा त्या व्यवसाय किंवा ब्रँडिंगशी काही देखील  संबंध नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

तसेच ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी या घोटाळ्याविषयी माहिती देत असताना सांगितले आहे की, या प्रकरणामध्ये गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे. “जर आम्हाला तपासामध्ये आढळलं की त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीसाठी मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात त्यांना साक्षीदार बनवू, असं ते यावेळी म्हणाले होते.

Govinda: तब्बल 1 हजार कोटींच्या पॉन्झी प्रकरणात गोविंदाची होणार चौकशी

काय आहे नेमकं प्रकरण?

क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. (Crime) कंपनीने तब्ब्ल २ लाख लोकांकडून १ हजार कोटी पैसे जमा केल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओत या कंपनीचं समर्थन केल्याचा धक्कादायक आरोप लावण्यात आले आहे.सोलर टेक्नो अलायन्स (STA- Token) हे अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. तसेच या ऑनलाइन पॉन्झी योजनेत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशामधील २ लाखापेक्षा जास्त लोकांकडून १ हजार कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचे देखील आर्थिक गुन्हे शाखेनं यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube