Download App

अजय देवगण गेल्या 18 वर्षांत ना बोलला ना मेसेजला उत्तर दिलं; दिग्गज दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

अजय देवगणसोबत कधी मतभेद झाले होते, असा प्रश्न विचारल्यावर ते लगेचच म्हणाले, “आमच्यात कोणतेच मतभेद नव्हते. निर्माते आणि

  • Written By: Last Updated:

Director Anubhav Sinha On Ajay Devgan : अभिनेता अजय देवगणची ‘कॅश’ चित्रपटात मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी 2007 मध्ये केलं होतं. त्यासोबत सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, जायेद खान, शमिता शेट्टी आणि दिया मिर्झा यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटानंतर अनुभव यांनी (Ajay Devgan ) अजयसोबत पुन्हा कधीच काम केलं नाही. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर आता 18 वर्षांनंतर अनुभव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 18 वर्षांपासून अजय देवगणशी बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे तो माझ्या मेसेजेसना उत्तर देत नाही, असाही खुलासा त्यांनी केला आहे.

मेसेजलाही उत्तर नाही

आमच्यात भांडण झालं नाही. फक्त तो माझ्याशी बोलत नाही आणि त्यामागचं कारण मलाही माहीत नाही. कॅश या चित्रपटानंतर आम्ही भेटलोसुद्धा नाही. त्यामुळे तो मला जाणूनबुजून दुर्लक्ष करतोय, असंही मी तुम्हाला सांगू शकत नाही. कदाचित हे माझे अतिविचार असतील. पण मी त्याला मेसेज केले होते. त्याच्याकडून माझ्या मेसेजला रिप्लाय कधीच मिळाला नाही. त्यामुळे कदाचित त्याने मेसेज पाहिले नसावेत, अशी मी स्वत:ची समजून काढतोय. पण गेल्या 18 वर्षांपासून आमच्यात अजिबात संवाद झाला नाही.”

Video : धडाकेबाज अ‍ॅक्शन असलेल्या गौरीशंकर  चित्रपटाचा टीजर लाँच; २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

अजय देवगणसोबत कधी मतभेद झाले होते, असा प्रश्न विचारल्यावर ते लगेचच म्हणाले, “आमच्यात कोणतेच मतभेद नव्हते. निर्माते आणि भांडवलदार यांच्यात मतभेद होते. मी या दोघांपैकी कोणीच नव्हतो. एका गाण्यावरून आमच्यात वाद झाल्याची चर्चा होती. पण असं काहीच नाहीये. माझ्या माहितीनुसार, आमच्यात कोणत्याच गाण्यावरून वाद झाले नव्हते. वादाच्या चर्चा खऱ्या नाहीत. अजय हा माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अभिनेता आणि व्यक्ती म्हणून मला तो खूप आवडतो. तो एक चांगला मित्र आहे. एखाद्या मित्राला काही गरज लागली तर सर्वांत आधी तो मदतीला धावून जातो”

follow us

संबंधित बातम्या