हास्याची अनोखी जत्रा…स्वप्नील जोशी ‘या’ चित्रपटात साकारणार विनोदवीर भूमिका!

हास्याची अनोखी जत्रा…स्वप्नील जोशी ‘या’ चित्रपटात साकारणार विनोदवीर भूमिका!

Swapnil Joshi Chiki Chiki Buboom Boom Movie : जिलबीनंतर स्वप्नील (Swapnil Joshi) घेऊन आला हास्याची अनोखी जत्रा घेवून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा टीझरमधून स्वप्नील विनोदवीर भूमिका साकारणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) येतोय. या चित्रपटात विनोदी भूमिकेत स्वप्नील दिसणार (Swapnil Joshi Movie) आहे. सातत्यपूर्ण कामासोबत वैविध्यपूर्ण भूमिका स्वप्नील जोशी साकारत आहे.

मुख्यमंत्री आज आमदार सुरेश धसांच्या मतदारसंघात; धनंजय मुंडेंची कार्यक्रमाकडं पाठ, कारण काय?

नवीन वर्षाची सुरुवात स्वप्नीलने गूढ आणि गोड जिलबी सोबत केली. आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन (Entertainment News) करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नीलने नव्या वर्षात चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाची घोषणा (Chiki Chiki Buboom Boom Movie) केली. त्यानंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याचं कळतंय. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार आहे. हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

उमेश पाटलांची घरवापसी; पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, म्हणाले..मी दादांना

स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो.अश्यातच चित्रपटाच्या कथेसोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारतो. त्या भूमिकांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठलीही असो स्वप्नील ती भूमिका करण्याचं आव्हानं पेलून तिला किती उत्तम बनवता येईल, याकडे लक्ष देऊन काम करतो. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

जिलबीमधला रांगडा, करारी लूक असलेला पोलीस अधिकारी… ते चिकी चिकी बुबूम बुममधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील. वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो यात शंका नाही. जिलबी, चिकी चिकी बुबूम बुमनंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील काहीतरी खास घेऊन येणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube