Download App

Box Office वर दिव्या खोसलाच्या ‘सावी’ कामगिरी सुधारली; दुसऱ्या दिवशी जमावला एवढा गल्ला

Divya Khosala ची एक चांगली चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळख आहे. नुकताच तिचा ‘सावी ए ब्लडी हाऊसवाइफ’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Divya Khosalas Savi grow on Box Office : एक चांगली चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळख असलेल्या दिव्या खोसला कुमारचा ‘सावी ए ब्लडी हाऊसवाइफ’ ( Savi A Bloody Housewife ) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. काही काळापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. ज्याची लोकांनी प्रशंसा केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने म्हणावी अशी कमाई केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कामगिरी सुधारली आहे.

मालेगावात माजी नगरसेवकावर हल्ला; धारदार शस्त्राने केले सपासप वार, हाताची बोटंही कापली..

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते. तर शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळवास 3 कोटी कमाई केल्याने चित्रपटाची एकुण कमाई 4.80 कोटी झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी धिम्या गतीने सुरू झालेला हा चित्रपट दुसऱ्या दिवशी मात्र चांगली कामगिरी करू शकला आहे. हा दिव्या खोसलाचा फ्रंट कॅमेरा असलेला दुसरा चित्रपट आहे. याआधी ती ‘यारियाँ 2’ मध्ये दिसली होती.

Raveena Tandon कडून कार अंगावर घालत वृद्ध महिलेला मारहाण; अभिनेत्री नशेत असल्याचा आरोप

काय आहे सावीची कहाणी?

सावीच्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात दिव्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो. चित्रपटात दिव्याच्या आयुष्यात एक मोठा अपघात होतो आणि त्यानंतर तिचे आयुष्य बदलून जाते. सावीची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुकेश भट्ट आणि टी-सीरीज यांनी केली आहे. ‘सावी अ ब्लडी हाउसवाइफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे. सावीमध्ये दिव्या खोसला कुमारसोबत अनिल कपूरचीही (Anil Kapoor) महत्त्वाची भूमिका आहे.

follow us