Download App

Duniyadari: ‘दुनियादारी’ला झाली १० वर्ष पूर्ण, ‘मैत्रीशी जुळलेलं नातं आजही कायम’…

Duniyadari movie : मराठी चित्रपटसृष्टीतला एक प्रचंड गाजलेला सिनेमा म्हणजे संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’. ( Duniyadari movie) या सिनेमाने चाहत्यांच्या मैत्रीची, प्रेमाची नवी व्याख्या शिकवली गेली. तरुणाईला तर या सिनेमाने अक्षरशः वेड लावलं होतं. ‘जिंदगी जिंदगी’ म्हणत अनेकांनी आपलं कॉलेज लाईफ एन्जॉय केलं. या सिनेमातील प्रत्येक गाणं चाहत्यांच्या तोंडी होतं. या सिनेमाने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली होती. दुनियादारी  हा सिनेमा १९ जुलै २०१३ रोजी रिलीज झाला.  या चित्रपटाला रिलीज होऊन 10 वर्ष होत आहेत.

या सिनेमात मराठीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) या सिनेमातील लोकप्रियता मिळाली ती म्हणजे त्या सिनेमामधील हटके डायलॉगमुळे. दुनियादारी या सिनेमात मैत्रीची, प्रेमाची नवी व्याख्या शिकवत अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांच्या ‘दुनियादारी’ चित्रपटात साकारलेले ‘दिग्या’ आणि ‘श्रेयस’ ही जोडी सुपरहिट ठरल्याचे दिसून आई आहे. या सिनेमात काही हटके डायलॉगची चांगलीच चर्चा झाली होती. ‘तेरी मेरी यारी…’, ओळखलं नाही हिने मला…, दिग्या नीच नाही रे!, बच्चू आहेस तू बच्चू…’

तसेच समोर हातात कॅडबरी असताना समोर बिस्कीट आलं तरी तेही सोडवत नाही. आणि सर्वात गाजलेला डायलॉग म्हणजे मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे…, आणि दुनियादारीतील दिग्याचा गाजलेला डायलॉग म्हणजे DSP म्हणजेच अपने नाम मै पुरा कॉलेज सब आया… या अशा हटके डायलॉगनी हा सिनेमा खूपच गाजला होता.

तसेच या सिनेमातीळ गाणे देखील कॉलेज तरुणाईना चांगलीच भुरळ पडली होती. ‘देवा तुझ्या गाभा-याला’ गाण्यासाठी गीतकार मंदार चोळकरसह संजय जाधव ६ तास गाणं पूर्ण लिहुन होईपर्यंत त्याच्यासोबत राहिले होते. सोनु निगमने गायलेलं ‘टिक टिक वाजते डोक्यात’ हे गाणं तर खुपजणांची त्यावेळेस काॅलरट्युन बनली होती.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

तसेच या सिनेमात ‘जिंदगी, जिंदगी दोस्तो की दुनियादारी मै हसी हो जिंदगी…’, यारा यारा फ्रेन्डशिपचा खेळ सारा…,’असे हटके गाणे या सिनेमात सुपरहिट ठरले होते.  या सिनेमात स्वप्नील जोशी. अंकुश चौधरी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, साई ताम्हणकर, उर्मिला कोठारे रिचा परियाली यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘दुनियादारी’ २०१३ साली चाहत्यांच्या भेटीला आली होती.

Tags

follow us