Download App

सुप्रसिद्ध अभिनेते बिरबल यांचे निधन, 500 हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या

Birbal passes away: सुप्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते बिरबल यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. बिरबल म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॉमेडियनचे खरे नाव सतींदर कुमार खोसला होते. त्यांचे खरे नाव त्यांनी सुरुवातीच्या काही चित्रपटांच्या क्रेडिटमध्ये वापरले होते.

बराच काळ आजारी होते
असे म्हटले जाते की, अभिनेता मनोज कुमारने सतींदर यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार ‘बिरबल’ हे नाव सुचवले होते आणि नंतर त्यांनी कायमचे स्विकारले केले. त्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी देखील ‘बिरबल’नाव वापरले आहे. हिंदी, पंजाबी, भोजपुरी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या बिरबल यांना पहिला ब्रेक राजा (1964) या चित्रपटात मिळाला होता. यामध्ये ते एका गाण्याच्या एका दृश्यात दिसत होते.

Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल…

500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले
राजा नंतर बिरबल यांनी दो बदन, बूंद जो बन गए मोती, शोले, मेरा गाव मेरा देश, क्रांती, रोटी कपडा और मकान, उर्वेश, अमीर गरीब सदमा, दिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या.

Tags

follow us