Sharada Rajan Ayyangar : प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांचं निधन; रेखा-हेमामालिनीला दिला आवाज

Sharada Rajan Ayyangar Passed Away : 70 च्या दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार (Sharada Rajan Ayyangar) यांचं आज 14 जून ला निधन (Passed Away) झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शारदा यांनी अनेक प्रसिद्ध गाणे गायले. तर ‘तितली उडी’ या गाण्यामुळे त्यांनी प्रचंह लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर […]

Sharada Rajan Ayyangar

Sharada Rajan Ayyangar

Sharada Rajan Ayyangar Passed Away : 70 च्या दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार (Sharada Rajan Ayyangar) यांचं आज 14 जून ला निधन (Passed Away) झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शारदा यांनी अनेक प्रसिद्ध गाणे गायले. तर ‘तितली उडी’ या गाण्यामुळे त्यांनी प्रचंह लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 ला तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. (famous Singer Sharada Rajan Ayyangar Passed Away )

“मला मारुन टाक, मगचं…” : मुलीने बॅगेतून आणला आईचा मृतदेह, Inside Story ऐकून पोलिसही शहारले

शारदा यांना ‘तितली उडी’ या गाण्यामुळे त्यांनी प्रचंह लोकप्रियता मिळाली. हे गाणं त्यांना मिळालं ते राज कपूर यांच्यामुळे शारदा या तेहरानमध्ये एका कार्यक्रमात गात असताना शारदा यांचं गाणं राज कपूर यांनी ऐकलं आणि लगेचच त्यांना 1966 मध्ये आलेल्या सुरज चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘तितली उडी’ हे गाण्याची संधी मिळाली.

बॉलवर अंगठी ठेवत तुषारचा अनोख्या पद्धतीने साखरपुडा, पाहा फोटो

या अभिनेत्रींना दिला आवाज :

शारदा यांनी हिंदीत शंकर-जयकिशन या जोडीसोबत काम केलं. त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक सुपरहिट गाणे दिले. तसेच त्यांनी मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोरकुमार, यशुदास, मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे.

हिंदीसह अनेक भाषांत काम…

गायिका शारदा राजन अय्यंगार या जरी दाक्षिणात्या असल्या तरी त्यांनी मुख्यत्वे हिंदीत काम केलं. तर हिंदीसह त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले. त्यामध्ये तेलूगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांचा समावेश आहे. तर आपल्या मराठीमध्ये त्यांनी लाजू नका मुळी मुलखाची मी भोळी, हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घटदाट ही गाणी गायली.

Exit mobile version