Download App

रेडिओवरील रेशमी आवाज हरपला : प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

मुंबई : रेडिओ जगतात आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे आज (21 फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा रझील सयानी यांनी याबाबतची माहिती दिली.

अमीन सयानी यांना मंगळवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दक्षिण मुंबईतील एच.एन.  रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Famous veteran radio announcer Ameen Sayani passed away)

धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

मुलगा रझील सयानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार इतरही आजार होते. ते मागील 12 वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता.

अमीन सयानी रेडिओचे प्रसिद्ध निवेदक :

रेडिओ सिलोन आणि नंतर विविध भारतीवर तब्बल 42 वर्षे चाललेल्या ‘बिनाका गीतमाला’ या अमीन सयानी यांच्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाने प्रसिद्धीचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. लोक दर आठवड्याला हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उत्सुक होते. ‘गीतमाला’ मुळे अमीन यांना देशभरात ओळख मिळाली.

Sharad Pawar : ‘इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद’; शरद पवारांनीच केलं शिक्कामोर्तब

अमीन सयानी यांच्या नावावर अनेक विक्रम :

अमीन सयानी यांच्या नावावर 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रमांचा रेकॉर्ड आहे. सुमारे 19,000 जिंगल्सना आवाज देण्यासाठी अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. त्यांनी भूत बांगला, तीन देवियां, कतला यांसारख्या चित्रपटांमध्ये निवेदक म्हणून काम केले आहे.

follow us