Download App

Fauj Movie: मराठा सैन्याची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन; जाणून घ्या सिनेमाबद्दल…

Fauj Movie: मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसापासून अनेक ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. ‘बलोच’ (Baloch Marathi movie) या ऐतिहासिक सिनेमानंतर दिग्दर्शक प्रकाश पवार (Director Prakash Pawar) यांनी ‘फौज’ या सिनेमाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘फौज’ सिनेमात सीमेवर लढणाऱ्या मराठी रेजिंमेंटच्या सैनिकांचा इतिहास दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


हा सिनेमा २०२४ मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा सैन्याची सीमेवरील शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘फौज – द मराठा बटालियन’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. २०२४ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सिनेमाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार करणार असल्याचे सांगितले जात आहेत.

‘फौज’ सिनेमाच्या पोस्टरमध्ये देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक दिसून येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या शूरवीर मराठा रेजिमेंटमधील फौजींची विजयगाथा ‘फौज– द मराठा बटालियन’मधून बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या टीमने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ‘पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे ‘द मराठा बटालियन’ ज्यांचे नाव ऐकल्यावर संपूर्ण देशाला अभिमान वाटणार आहे आणि शत्रूंना भीती! अशा वीरांची मर्दुमकी ‘फौज द मराठा बटालियन’ लवकरच येणार २०२४ मध्ये!” असे सांगितले आहे.

Big B साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? काय असणार सिनेमाची कहाणी 

सिनेमाविषयी सांगत असताना प्रकाश जनार्दन पवार म्हणतात की, मराठा बटालियन ही भारतीय सैन्यामधील सर्वात जुनी रेजिमेंट असल्याचे सांगितले जात आहे. इंग्रजांच्या काळात देखील ती होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानले जात असायचे. या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आतापर्यंत अनेकवेळा शौर्य दाखवले आहे. तसेच एका शौर्य कथेमधील गोष्ट आम्ही ‘फौज द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे मांडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us