Download App

Filmfare Ott Award 2023: आलियाने ओटीटी पुरस्कारामध्ये मारली बाजी, ‘या’ कलाकारांचाही झाला सन्मान!

Filmfare OTT Awards 2023: सध्या सिनेमाच्यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मना देखील खूप महत्त्व मिळायला लागलं आहे. अनेक चित्रपट, सीरिज या थेट ओटीटीवर रिलीज होत आहेत. आणि चाहत्यांचा त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमा तसेच सीरिजमधून नवीन चेहेरेदेखील समोर येत आहेत. अनेकदा बॉलिवूड कलाकारांनी तर ओटीटीवर एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. सैफ अली खान, मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ते शाहिद कपूरपर्यंत अनेक स्टार्स आता ओटीटीकडे वळू लागल्याचे दिसत आहेत.

प्रत्येकवर्षी प्रमाणे नुकताच फिल्मफेअरचा यावर्षीचा ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आलिया भट्टने ( Alia Bhatt) यंदाच्या ओटीटी पुरस्कारात देखील जोरदार बाजी मारली आहे, तर मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमाला देखील चांगलेच पुरस्कार मिळाले आहे. फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2023 मध्ये नेमके कोणकोणते पुरस्कार मिळाले ते जाणून घेणार आहोत.

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2023 यादी :
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट पदार्पण – राजश्री देशपांडे ( वेब सीरिज : ट्रायल बाय फायर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -अपूर्व सिंह कारकी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
बेस्ट वेब ओरिजिनल फिल्म – सिर्फ एक बंदा काफी है
क्रिटिक्स चॉइस बेस्ट वेब ओरिजिनल फिल्म – वासन बाला, ओ माय डार्लिंग
सर्वोत्कृष्ट कथा- दीपक किंगरानी ( सिर्फ एक बंदा ही काफी है)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- स्वपनिल सोनावना (मोनिका ओ माय डार्लिंग)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- मीनल अग्रवाल (कला)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- नितिन बैड( डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- अनीरबन सेनगुप्ता (डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्युझिक- अंचीत ठक्कर (मोनिका ओ माय डार्लिंग)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, शॉर्ट फिल्म- मृणाल ठाकुर (जाहान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता, शॉर्ट फिल्म- मानव कौल (फिर कभी)


वेब सीरिज
सर्वोत्कृष्ट अभिनेता- ड्रामा- सुरविंदर विक्की (कोहरा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ड्रामा- राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विक्रमादित्य मोटवानी (जुबली)
सर्वोत्कृष्ट सीरीज- स्कूप
क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट सीरीज- ट्रायल बाय फायर
क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रणदीप झा (कोहरा)
क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- करिश्मा तन्ना (स्कूप)
क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ड्रामा- सोनाक्षी सिन्हा (दहाड)
क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा- विजय वर्मा (दहाड)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्टोरी- गुंजीत चोप्रा, डिगी सिसोदिया (कोहरा)

Neena Gupta:’महिलांना पुरुषांची गरज असते…’; वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा खळबळजनक खुलासा

सीरीज अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्टोरी- गुंजीत चोप्रा और डिग्गी सिसोडिया ( कोहरा)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल संवाद- करण व्यास (स्कूप)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- गुंजीत चोप्रा, सुदीप शर्मा (कोहरा)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- अपर्णा सूद, मुकुंद गुप्ता (जुबली)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- आरती बजाज (जुबली)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रतीक शाह (जुबली)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- श्रृती कपूर (जुबली)
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- अर्पण गगलानी (जुबली)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्यिझिक- अलोकनंदा दासगुप्ता (जुबली)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साउंडट्रॅक- अमित त्रिवेदी आणि कौशर मुनीर (जुबली)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- कुणाल शर्मा आणि ध्रुव पारेख ( जुबली)

सोबतच उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून शेफाली शाह यांना ‘डार्लिंग्स’ या सिनेमासाठी आणि अमृता सुभाष हिला ‘द मिरर’ आणि ‘लस्ट स्टोरीज 2’साठी पुरस्कार देण्यात आला आहे.

Tags

follow us