Fire On Meet Serial Set : ‘मीत’ सिरियलच्या सेटवर आग; सेटवरील एक रूम जळून खाक

Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिरीयल ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ (Meet Badlegi Duniya KI Reet) या सिरियलच्या सेटला आग लागली आहे. या सेटला अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मीत’ या सिरियलमधील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) या घटनेविषयी माहिती दिली आहे. ‘मीत : […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 31T104605.666

Fire On Meet Serial Set

Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिरीयल ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ (Meet Badlegi Duniya KI Reet) या सिरियलच्या सेटला आग लागली आहे. या सेटला अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मीत’ या सिरियलमधील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) या घटनेविषयी माहिती दिली आहे.

‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ (Meet Tv Serial) या सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत असणारी आशी सिंहने आग लागल्याची माहिती दिली आहे. शॉट सर्किटमुळे आग लागली असल्याचे यावेळी अभिनेत्रीने सांगितले आहे. सेटवरील एक रूम संपूर्ण जळून खाक झाली आहे, तरी सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ या सीरियलमध्ये आशी सिंह आणि शगुन पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

‘या’ कारणाने लागली आग…. 

‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ या सिरियलचा सेट ठाण्यातील मीरा रोड परिसरामध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरियलच्या सेटवरील एका रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. त्यानंतर या रूममधील सर्व कॅमेरे आणि उपकरणे खोलीतून बाहेर काढण्यात आले आहेत. पण या आगीमध्ये ती संपूर्ण रूम जळून खाक झाली आहे. आता ही आग नक्की कशामुळे लागली याचा अधिकचा तपास सुरू आहे.

‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री आशी सिंहने आग लागल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली,”मीत : बदलेगी दुनिया की रीत’ या सिरियलच्या सेटला आग लागली. पण लगेचच ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. ज्या रूममध्ये आग लागली आहे, त्या रूममध्ये त्यावेळी कोणी नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जूनमध्ये ओटीटीवर क्राईम आणि सस्पेन्सचा धमका, स्कूप ते ब्लडी डॅडी होणार रिलीज

आता आग आटोक्यात आल्याने लवकरच शूटिंगला सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ ही छोट्या पडद्यावीरल लोकप्रिय सिरीयल आहे. या सिरीयलमध्ये आशी सिंह आणि शगुन पांडे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. ‘बोकुल कोठा’ या बंगाली सिरीयलमध्ये ही सिरीयल रिमेक आहे. या सिरीयलतील नाट्य चाहत्यांना पसंतीस उतरत आहे. वैभव सिंह या सिरीयलचे दिग्दर्शन करत आहे.

Exit mobile version