First Kannada female superstar B Saroja Devi passes away at the age of 87 : कोटा श्रीनिवास यांच्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटा सृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज दाक्षिणात्य अभिनेत्री बी सरोजा देवी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर वयाच्या 17 व्यावर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या बी सरोजा देवी यांना पहिल्या कन्नड महिला सुपरस्टार म्हणून ओळखलं जात होतं.
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरण विधानसभेत; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री काय म्हणाले?
बी सरोजा देवीं यांनी त्यांच्या 7 दशकांहून अधिकच्या करिअरमध्ये कन्नडसह तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना लोक अभिनय सरस्वती आणि कन्नडथु पैंगिली या नावांनी ओळखत होते. त्यांनी वयाच्या 17 व्यावर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. त्या 1955 मध्ये आलेल्या महाकवी कालिदासमधून करिअरला सुरूवात केली. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण सारखे अनेक पुरस्कार मिळाले.
कुरैश समाजाचा मोठा निर्णय…, अहिल्यानगरमध्ये जनावर खरेदी विक्रीचा व्यापार केला बेमुदत बंद
त्यानंतर त्यांना 1958 मध्ये आलेल्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘नादोदी मन्नन’ मधून त्यांना खास ओळख मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत एम जी रामचंद्रनही होते. त्यानंतर त्यांची जोडी हिट झाली. त्यांना घरा-घरांत ओळखलं जाऊ लागलं. एमजीआर आणि सरोजा देवी या जोडीने सलग 26 चित्रपट बॅक-टू-बॅक हिट दिले.
सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकले आहात का? ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘डार्क पॅटर्न्स’चा सापळा
त्यामध्ये नादोदी मन्नन (1958), थिरुदाथे (1961), थाई सोल्लई थट्टाधे (1961), पासम (1962), कुदुम्बा थलाइवन (1962), मदाप्पुरा (1962), थायई कथा, थानयन (1963), धर्मम थलाई कक्कुम (1963), नीधिक्कुप्पिन पासम (1963), धेइवा थाई (1964), पदागोटी (1964), आसई मुगम (1965), नादोदी (1966), थली भाग्यम (1966), नान अनाइयिटल (1966), पेट्रालथन पिल्लैया (1966), अरसा कट्टलाई (1967), पनाथोट्टम (1963), पेरिया इदाथु पेन (1963), पनक्कारा कुदुम्बम (1964), एन कदमाई (1964), थायिन मडियिल (1964), एंगा वीट्टू पिल्लई (1965), कलंगराय विलक्कम (1965), अंबे वा (1966) आणि परक्कुम पावई (1966) या चित्रपटांचा समावेश आहे.
आरएसएससाठी तरुणपणीच दोन्ही पाय गमविले; राज्यसभेवर जाणारे सदानंदन मास्टरांची अनोखी स्टोरी…
सरोजा देवींच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना 1969 मध्ये पद्मश्री आणि 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना तामिळनाडूचा कलाईममणि आणि बॅंगलोर विद्यापीठाची डॉक्टरेटची मानद पदवी मिळाली होती. सरोजा देवी यांनी शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, एन.टी., रामाराव आणि डॉ. राजकुमार यासारख्या दिग्गजांसोबतही काम केलं.
सामाजिक न्याय विभागाच्या 1500 कोटींच्या टेंडरचा घोटाळा उघड; संजय शिरसाटांचा पाय आणखी खोलात
त्यांनी1955 आणि 1984 मध्ये सलग 161 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका निभावली आणि एक नवा रेकॉर्ड बनवला. त्यांची सर्वांत चर्चेतील जोडी ही एमजी यांच्यासोबत होती. एमजीआर आणि सरोजा देवी यांच्यातील केमिस्ट्री दक्षिण भारतीय सिनेमाच्या इतिहासात नमूद आहे. तेलूगु चित्रपटांमध्ये त्यांनी एन.टी. रामा राव यांच्यासह ‘सीताराम कल्याणम’, ‘जगदेका वीरुनी कथा’ आणि ‘दागुडु मूथालु’ यांसराख्या चित्रपटांमध्ये काम केले. जे सुपरहीट झाले. सरोजा देवी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. ‘पैगाम’, ‘ओपेरा हाउस’, ‘ससुराल’ आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.