कुरैश समाजाचा मोठा निर्णय…, अहिल्यानगरमध्ये जनावरे खरेदी विक्रीचा व्यापार केला बेमुदत बंद

कुरैश समाजाचा मोठा निर्णय…, अहिल्यानगरमध्ये जनावरे खरेदी विक्रीचा व्यापार केला बेमुदत बंद

Jamiyatul Quraish Community : नगर शहरातील जमीयतुल कुरैश समाजाची बेपारी मोहल्ला झेंडीगेट (Zendigate) येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमुखाने सर्व समाज बांधवांच्या वतीने जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार बंद करण्यात आले असल्याचा हा एक मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाला सर्व समाज बांधवांनी स्वागत करत येणाऱ्या काळात जमीयतुल कुरैश समाजातील (Quraish Community) व्यक्ती जनावरांचा व्यापार करणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अधिकृत परवानगी असणाऱ्या जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील काही संघटनेच्या वतीने जमीयतुल कुरैश समाजाला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे व पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसतांना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत असून कायद्याने मान्यता प्राप्त जनावर आणली तरी त्रास होत आहे व संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या गोहतेच्या नावा खाली चालु असलेली दहशत तथाकथित गोरक्षक यांच्याकडून जमीयतुल कुरैश समाजातील व्यक्तींनी व्यापारासाठी आणलेले जनावरे हे कतली साठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून गुन्हे दाखल होऊन वाहने व आदी साहित्य जप्त होत असल्याने यामध्ये कुरेशी समाजाचा मोठा नुकसान होत आहे. त्यामूळे कुरेशी समाज हा जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद केला.

जनावरे खरेदी-विक्री करत असून शेतकरी व खाटीक यांची एक नाळ आहे जे शेतकऱ्यांचे भाकड जनावरे असतात जे दूध देत नाही काम करत नाही हे फक्त खाटीक शिवाय विकत कोणीच घेत नाही व कायद्याने मान्यता प्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन जनावरे खरेदी करतात मात्र काही संघटनेचे लोक खाटीकांना मारहाण करून त्यांच्या पासून पैसे घेतात व रीतसर कागदपत्र असताना देखील अडवत आहे.

सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकले आहात का? ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘डार्क पॅटर्न्स’चा सापळा

त्यामुळे संपूर्ण खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद करून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील जमीयतुल कुरैश जमातचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube