Download App

Ganapath Teaser: परम सुंदरी अन् बिग बींच्या ‘गणपत’चा टीझर प्रदर्शित 

  • Written By: Last Updated:

Ganpath Teaser: बिग बीं, टायगर आणि बाॅलिवूडची (Bollywood) परम सुंदरी`क्रिती सेनाॅनच्या (Kriti Sanon) गणपत सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. अखेर आज त्यांच्या या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Amitabh Bachchan) या सिनेमाचा टीझर आज २९ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच आज सकाळपासून या सिनेमाच्या टीझरने सोशल मिडीयावर (Social media) जोरदार धुमाकूळ घातला आहे.

GANAPATH | Hindi Teaser | Amitabh B, Tiger S, Kriti S ❘ Vikas B, Jackky B | 20th Oct' 23

तसेच गणपतच्या टीझरमध्ये २०७० सालची कथा असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला बघायला मिळत आहे की, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ध्यान करायला बसलेला असतो. काही गुंड त्याला मारण्यासाठी आल्याचे दिसत आहेत. त्यांच्यासोबत टायगर जोरदार फायटिंग केल्याचे बघायला मिळत आहे. तसेच एक टेक्नोलॉजीने भरलेलं शहर दिसतं आहे.

Pune ganesh visarjan | IPS संदीप कर्णिक आणि बालन कसे थिरकले? बघा! | LetsUpp Marathi

टायगर फाईटर म्हणून रिंगमध्ये बॉक्सिंग करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे परम सुंदरी क्रिती सेनॉन सुद्धा हटक्या अवतारात बघायला मिळत आहे. आणि चाहत्यांचे लाडके अमिताभ बच्चन देखील एका अनोख्या लूकमध्ये बघायला मिळत आहेत. एकूणच अ‍ॅक्शनचा जोरदार तडका असलेल्या गणपतचा टीझर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तसेच ‘गणपत’ या सिनेमात टायगर श्रॉफ, चाहत्यांची लाडकी परम सुंदरी क्रिती सनॉन हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

या सिनेमात अॅक्शन-थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल हे करत आहेत. या अगोदर टायगर आणि क्रितीने ‘हिरोपंती’ या सिनेमात देखील एकत्र काम केल्याचे बघायला मिळाले होते. म्हणून पुन्हा एकदा ही जोडी एका दमदार भूमिकेत बिग बीं सोबत हटक्या अंदाजात बघायला मिळत आहेत. गणपत हा सिनेमा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us