Download App

Ganpati Bappa Song : ‘पार्वती नंदना, एकदंत गजानना’, वंदना गुप्तेंचं बाप्पासाठी स्पेशल गाणं

भिनेत्री वंदना गुप्तेआणि गायिका उत्तरा केळकर या जोडीचा 'पार्वती नंदना' (Parvati Nandana) हा सोलो अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • Written By: Last Updated:

Parvati Nandana Song : गणेशोत्सव हा बाप्पाच्या गीतांशिवाय (Ganpati Bappa Song 2024) पूर्णच होऊ शकत नाही. गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) वेध लागताच सगळीकडं बाप्पाचं नामस्मकरण करणारी गीते ऐकायला मिळतात. दरवर्षी बाप्पाची नवनववीन गीते येत असतात. आता अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) आणि गायिका उत्तरा केळकर (Uttara Kelkar) या जोडीचा ‘पार्वती नंदना’ (Parvati Nandana) हा सोलो अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास विरोध करणार; अजितदादांचा रोख कुणाकडे? 

‘पार्वती नंदना’ हा सोलो अल्बम ‘आदित्य नायर प्रॉडक्शन’च्या वतीने नुकताच रिलीज झाला आहे. कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेले हे गाणे गायिका उत्तरा केळकर आणि बालगायक आदित्य.जी नायर यांनी गायलं. संगीत प्रवीण कुंवर यांचे आहे. गुरू नायर प्रॉडक्शन या अल्बमचे निर्माते आहेत.

‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, 18 ऑक्टोबरला चित्रपट होणार रिलीज 

कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करूनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंदाचे अन् उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसातं प्रत्येकामध्ये एक उत्साह पाहायला मिळतो. हाच उत्साह आजी आणि नातवाच्या या गाण्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पार्वतीनंदना
एकदंत गजानना
दुर्वाहार तुझ्या गळ्यामधे शोभतो
तुझे कान भले मोठे
अन डोळे छोटे छोटे
कसा बाप्पा तू गोजिरा वाटतो
असे बोल असलेल्या या गाण्यामध्ये आजी आणि नातवाचं गणपती बाप्पाप्रती असलेले प्रेम दिसून येतंय.

या गाण्याबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणतात, पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, काळ पुढे सरकत जातो, पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडावे लागले. तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्व आपल्या नातवाला गाण्याच्या माध्यमातून समजावणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आह. हे गाणं करताना या सगळ्याचं समाधान नक्कीचं जाणवलं.

कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यामुळं एक छान गाणं गायला मिळाल्याचा आनंद उत्तरा केळकर यांनी व्यक्त केला. तर चांगल्या टीमसोबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास गुरू नायर यांनी व्यक्त केला.

follow us