Gauri Khan: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shah rukh Khan) सध्या त्याच्या ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंग खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो.
किंग खान आणि गौरी खान (Gauri Khan) हे बी-टाऊनचे पॉवर कपल मानले जाते. हे जोडपे 32 वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरी खानशी लग्न केले. आता अभिनेत्याची लेक सुहाना खाननेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की गौरी खान अभिनयाला सर्वात वाईट प्रोफेशन मानते. गौरी खानने घरात काही नियम बनवले आहेत, जे किंग खानला देखील पाळावे लागत असतात. शिवाय शाहरुख खानला घरात चित्रपटांशी संबंधित कोणतेही काम करण्याची आजिबात परवानगी नाही.
अलीकडेच गौरी खानने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही घरात अभिनयाबद्दल कधीही चर्चा करत नाही. शाहरुख कधी हिंदी चित्रपटाचा व्हिडीओ बघायला बसला तर मला वाटतं की मी टीव्ही तोडेन. जर त्याने घरी स्क्रिप्ट आणली तर ती थेट खिडकीच्या बाहेर जाते. या सगळ्यासाठी त्याच्याकडे सेटवर भरपूर वेळ असतो, असे थेट गौरी खानने सांगितले आहे.
गौरी खानने बनवलेले नियम किती काटेकोरपणे पाळले जातात याचा अंदाज यावरून लावता येतो. गौरी घरी नसतानाच शाहरुख खानला भेटायला कोणताही चित्रपट निर्माता येत असे. मात्र, शाहरुखने घरासमोर ऑफिस बनवल्यावर गौरीला त्याच्या येण्या-जाण्यात कोणतीही अडचण आली नाही. ती पुढे म्हणाली, “जेव्हा तो समोरच्या खोलीत त्याचे ऑफिस सुरू करेल, तेव्हा आम्हाला पुन्हा पुन्हा त्याला आठवण करून द्यावं लागत.
100 कोटींपेक्षा अधिक हिट सिनेमा दिलेले टॉप अभिनेते कोण? जाणून घ्या रणबीरचं स्थान
शाहरुख खानसोबत लग्नानंतर मुंबईत शिफ्ट झाल्यावर गौरी म्हणाली की, मला मुंबईचा तिरस्कार आहे. मला माझ्या कुटुंबाची आठवण झाली. मी इथे क्वचितच लोकांना ओळखत होते. नंतर सर्वकाही ठीक झाले आणि मला ते शहर आवडू लागले. शाहरुख ज्या निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करत होता, त्यांच्याशी तिने सोशलाईज करणे टाळले, पण तिचे स्वतःचे मित्र होते, ज्यांच्यासोबत ती पार्टीला जायची.
गौरी अभिनयाला वाईट व्यवसाय मानते
तर गौरी खान 1994 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ती अभिनयाला सर्वात वाईट व्यवसाय मानते. इंडस्ट्रीतून तिला कितीही मोठी ऑफर आली तरी ती त्याला कधीच हो म्हणणार नाही, असे ती यावेळी म्हणाली होती.