एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’

Gautami Patil : आपल्या डान्समुळे सध्या महाराष्ट्राभर चर्चेत असणारं नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) . गौतमीचे गावागावात असंख्य चाहते आहेत, पण तिच्या काही डान्स व्हिडीओंनंतर तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे तिला अनेकदा माफी देखील मागावी लागली आहे, तसेच लोकांच्या रागालाही अनेकदा सामोरे जावे लागले आहे. पण तिने त्यात आपण […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T170728.054

Gautami Patil

Gautami Patil : आपल्या डान्समुळे सध्या महाराष्ट्राभर चर्चेत असणारं नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) . गौतमीचे गावागावात असंख्य चाहते आहेत, पण तिच्या काही डान्स व्हिडीओंनंतर तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे तिला अनेकदा माफी देखील मागावी लागली आहे, तसेच लोकांच्या रागालाही अनेकदा सामोरे जावे लागले आहे. पण तिने त्यात आपण सुधारणा केली असल्याचे देखील सांगितले होते.


गौतमी तिच्या डान्समुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. तिची कौटुंबीक पार्श्वभूमी, तिचं शिक्षण, तिचे पालक या गोष्टींविषयी तिच्या चाहत्यांमध्ये कायमच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच आपल्याला जबाबदाऱ्या उचलणारा आणि समजून घेणारा मुलगा हवा आहे, असं तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

या मुलाखतीत तिने आयुष्यातील कितीतरी कठीण प्रसंगाचा खुलासा केला आहे. गौतमीने तिचा आवडता खाद्यपदार्थ, फिरायला कुठे जायला आवडतं, अशा अनेक आवडी- निवडीविषयी सांगितले आहे. तिला पुरणपोळी खायला खूप आवडते आणि फिरण्याकरिता समुद्रकिनारी फिरायला खूप आवडत, असल्याचे गौतमीने सांगितले आहे.


यावेळी तिला रॅपिड फायरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), असा सवाल विचारण्यात आला. तिला दोन्हीपैकी एक नाव निवडायचं होतं. पण तिने यावर उत्तर देणं टाळले आहे. तसेच ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’, असं ती हसत अँकरला बोली आहे.

चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांचे प्रेमाने उत्तर; म्हणाले, ‘अशोक मामा मला अशी हाक मारतो…’

या अगोदर अजित पवारांची (Ajit Pawar) नाराजी ओढवून घेतलेल्या गौतमीला आता पुन्हा अडचणीत यायचं नाही. म्हणून खूप हुशारीने तिने उत्तर देणं टाळले आहे. सध्या राजकारणात परिस्थिती बघता दोन गट पडल्याने कोण कोणत्या गटात आहेत, हे खुलेपणाने सांगणे अनेकांकरिता कठिण झाले आहे. मग गौतमी पाटीलची तरी यातून कशी होणार सुटका.


सध्या गौतमी पाटीलचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी ती तबब्ल दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते. अगदी लहान वयातच तिची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ वाढत आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असं जागोजागी ऐकू येत आहे. गौतमी पाटील लवकरच आगामी ‘घुंगरु’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. काही व्हायरल व्हिडिओमुळे गौतमीचं चांगलेच नशीब चमकले आहे.

Exit mobile version