Download App

Sambhaji Bhagat : शाहीर संभाजी भगत यांची गौतमी पाटीलबाबत पोस्ट; म्हणाले, ‘नाचणाऱ्या बायका…’

Sambhaji Bhagat On Gautami Patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. (Shahir Sambhaji Bhagat) गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे.


नेमकं काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?
दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी आपला मत व्यक्त केले आहे. शाहीर संभाजी भगत यांनी गौतमीचे नाव न घेता म्हटले आहे की,नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….
ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!

आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!

पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

किरण माने यांच्या पोस्टची देखील मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे गौतमीच्या चाहत्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खाजगी आयुष्यावर काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीने तिचे जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून वय २५ असल्याचे सांगितले एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

Tags

follow us