Abhijeet Sawant : ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत घेऊन येतोय 90’s बँड !

Abhijeet Sawant :  पहिला वहिला इंडियन आयडॉल गायक ते आज विविध रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज गाजवणारा ट्रेंड सेटर गायक

Abhijeet Sawant

Abhijeet Sawant

Abhijeet Sawant :  पहिला वहिला इंडियन आयडॉल गायक ते आज विविध रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज गाजवणारा ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज होत आहे. सोशल मीडिया वर कायम चर्चेत असणाऱ्या अभिजीतने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला असून या व्हिडीओने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

इंडियन आयडॉल, बिग बॉस मराठी, मास्टरचेफ, इंडियन आयडॉल लीजेंड्स रिटर्न अश्या विविध रियालिटी शो मधून आजवर अभिजीत दिसला असून लवकरच तो 90’s बँड मधून प्रेक्षकांना नव्वदीच्या दशकांतील गाण्यांची अनोखी सफर घडवणार असल्याचं कळतंय. आता नेमका हा बँड नक्की काय ? तो कधी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अभिजीत या नव्या संकल्पने बद्दल बोलताना सांगतो “नव्वदीच्या दशकातील गाणी आजही सगळ्यांना आवडतात याच गाण्याची मैफिल या 90 ’s बँड मधून घेऊन यावी ही या मागची संकल्पना आहे. आज वेगवेगळ्या फॉर्म मधली गाणी गाताना जुन्या गाण्याची गंमत ही काहीतरी औरच आहे हे जाणवतं आणि म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्वदीच्या दशकात घेऊन जाव अस वाटतंय आणि हेच 90’s बँड मधुन प्रेक्षकांनी अनुभवावं”

कातिल नहीं.. आशिक हूं…’, शाहरुख खानने ‘किंग’चा नवा दमदार पोस्टर केला प्रदर्शित-

नव्वदीच्या गाण्याची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार असून आताच्या जेनझी सारख्या फॅन्सला देखील अभिजीतचा 90’s बँड हा भुरळ घालेल यात शंका नाही. वर्क फ्रंट वर सध्या अभिजीत पुन्हा एकदा त्याचा OG इंडियन आयडॉल गँग सोबत इंडियन आयडॉल लीजेंड्स रिटर्न मध्ये परफॉर्म करताना बघायला मिळतोय. येणाऱ्या काळात 90’s बँड सोबत अभिजीत अनेक नवनवीन गाण्यामधून काम करणार असल्याचं देखील कळतंय.

Exit mobile version