Download App

Girija Oak : आठ गाणी अन् ‘दोन स्पेशल’ नाटक, गिरिजा करणार रंगभूमीवर पदार्पण!

  • Written By: Last Updated:

Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका साकारत आहे सोबतीने या साठी गिरीजाने आठ गाणीही लाईव्ह गायली आहेत.

‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा

शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकल्यानंतर ‘व्हॅक्सिन वॅार’ या हिंदी चित्रपटात गिरीजाने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली. लवकरच तिची हिंदी वेब सिरीजही येणार आहे. कायम तिने विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आगामी नाटकात देखील तिच्या अभिनयाची अनोखी बाजू बघायला मिळणार आहे. ती इंग्रजी नाटकात गौहरच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘वंचित’ अजून ‘मविआ’मध्ये नाही, ‘त्यांच्या’ जागावाटपानंतरच चर्चा करू’; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

लिलेट दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गौहर’ या नाटकात गिरीजासोबत नीना कुळकर्णीही आहेत. विविध भाषांमध्ये गाणाऱ्या कोलकात्यातील प्रसिद्ध गायिका गौहर जान यांची कारकिर्द 19 व्या शतकाच्या सुरुवातीला बहरली होती. व्हॅक्स रेकॅार्डवर गाणी रेकॅार्ड होणाऱ्या गौहर आशियातील पहिल्या आर्टिस्ट आहेत. गौहरच्या विविध राग-बंदिशी अडीच मिनिटांच्या छोट्या कंपोझिशन्स रेकॅार्ड प्रचंड महागड्या असूनही जगभर गाजल्या. अशा गौहरचा प्रवास नाट्यरूपात रसिकांसमोर येत आहे. गायकीसोबतच पैशानेही खूप श्रीमंत असलेल्या गौहर यांच्या आयुष्यातील उतार-चढावांवर आधारलेले ‘गौहर’ हे नाटक आहे. यात गौहरची व्यक्तिरेखा गिरीजा साकारत आहे.

एप्रिलमध्ये या नाटकाचे दोन प्रयोग मुंबईत होणार असून यात गिरीजा वेगवेगळ्या भाषांमध्ये आठ गाणी गाणार आहे. बंगाली, कानडी, इंग्रजी आणि उरलेली हिंदीत आहेत. बऱ्यापैकी क्लासिकल असलेली ही गाणी गिरीजा लाईव्ह गाणार आहे.गौहर या नाटकात गिरिजा च्या अभिनयाची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

follow us

वेब स्टोरीज