Download App

Govinda : गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, गोळी लागल्यानंतर पहिल्यांदा समोर आला अभिनेता

Govinda Firing: अभिनेता गोविंदा चुकून स्वत:वर गोळी झाडल्याने जखमी झाला होता. अखेर 3 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला .

Govinda Discharged From Hospital: 1 ऑक्टोबर रोजी गोविंदाच्या (Govinda ) पायाला चुकून गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी अभिनेत्याच्या पायाची गोळी काढली. तीन दिवस डॉक्टरांच्या (Govinda Discharged ) देखरेखीखाली राहिल्यानंतर अखेर आज गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या वृत्ताने चाहते खूप खूश आहेत.


व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलच्या बाहेर

गोविंदा व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलच्या बाहेर आला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता आणि कुटुंबीय उपस्थित होते. अभिनेत्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते. गोविंदाने हात जोडून चाहत्यांचे आभार मानले. यादरम्यान, त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहून अभिनेता भावूक झाला आणि त्याचे डोळे पाणावले होते.

6 आठवडे बेड रेस्ट घेणार

अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी गोविंदाची पत्नी सुनीता यांनी पॅप्सची भेट घेतली. यावेळी सुनीताने सांगितले की, आज गोविंदाला एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल आणि घरी जाईल. घरात आनंदाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले. सुनीताने पुढे सांगितले की, डॉक्टरांनी अभिनेत्याला 6 आठवडे झोपण्याचा सल्ला दिला आहे.

8-10 टाके पडले

60 वर्षीय अभिनेत्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाली. गोविंदाच्या पायाला गोळी काढून बुधवारी सामान्य वॉर्डात हलवण्यात आले. डॉ. अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अभिनेत्याला 8-10 टाके पडले आहेत, तर गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी सांगितले की, अभिनेत्यासोबत हा अपघात पहाटे 4.45 वाजता झाला. त्यावेळी तो एका शोसाठी कोलकाता येथे जाण्यासाठी सकाळी 6 वाजता घरून निघण्याच्या तयारीत होता. अभिनेता आपले परवानाकृत रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना चुकून त्याचा ट्रिगर दाबला गेला आणि त्याच्या पायात गोळी लागली.

Govinda Gun Fire : अभिनेता गोविंदाला लागली गोळी, चाहत्यांसाठी अभिनेत्याचा ऑडिओ मेसेज

165 हून अधिक चित्रपट केले

165 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या गोविंदाचे खरे नाव गोविंद अरुण आहुजा आहे. गोविंदाने आपल्या फ्री स्टाइल डान्स आणि कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत शोला और शबनम, आंखे, राजा बाबू, कुली नंबर 1, हसिना मान जायेगी असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा शेवटचा 2019 मध्ये रंगीला राजामध्ये दिसला होता. तेव्हापासून तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

follow us