Govinda Gun Fire: बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या (Govinda ) पायाला आज सकाळी गोळी (Govinda Gun fire) लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलीवूड (Bollywood) अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर गोविंदला तातडीने CRITI केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोविंदा सकाळच्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाला असतानाच चुकून बंदुकीतून मिसफायर झाला. आता त्याच्या प्रकृतीबाबत स्वतः अभिनेत्याने ऑडिओ क्लिपद्वारे माहिती दिली आहे.
Govinda Gun Fire: अभिनेता गोविंदा जखमी… चाहत्यांसाठी ऑडिओ मेसेज शेअर. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या बं*दुकीतून गो*ळी मिसफायर झाल्याची धक्कादायक घटना घडली. याच दरम्यान गोविंदाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.#govinda #ActorGovinda #LetsUppMarathi #Shivsena #misfire pic.twitter.com/hgwSJoTGxo
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 1, 2024
बॉलिवूड अभिनेता गोविंदा म्हणाला की, आपल्याला सर्वांचा आणि आई- वडिलांचा आशीर्वादामुळे आणि देवाच्या कृपेने मला गोळी लागून सुद्धा मी सुखरूप आहे. आणि आता ती गोळी काढण्यात आली आहे. माझ्या काळजीबद्दल मी सर्वांना धन्यवाद….
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळी सुटल्यानंतर काही पोलीस (Mumbai Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी गोविंदाकडील बंदूक ताब्यात घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून मोठा रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे गोविंदाची प्रकृती जास्तच बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोविंदाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर गोविंदा सध्या अभिनयापासून दूर आहे. अनेक वर्षांपासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. त्याचे म्युझिक व्हिडिओ मात्र अधूनमधून येत असतात. याबरोबरच गोविंदा काही रियलिटी शोमध्ये दिसला आहे. टिव्हीवर गोविंदा बऱ्याचदा पत्नी सुनीताबरोबर दिसत असतो. मध्यंतरी त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा राजकारणाची नवी इनिंग सुरू केली आहे.
मोठी बातमी : अभिनेता गोविंदाला लागली गोळी; स्वतःच्याच रिव्हॉलरमधून गोळी सुटल्याने जखमी
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्याला निवडणुकीत तिकीट काही मिळालं नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात मात्र त्याने शिंदे गटाच्या काही उमेदवारांचा प्रचार केला होता. निवडणुकीनंतर गोविंदा पुन्हा पडद्याआड झाला होता. आता पुन्हा गोविंदा चर्चेत आला आहे. गोविंदाच्या रिव्हॉल्वहरमधून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाला आहे. त्याच्यावर अंधेरीतीली क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.