Download App

फक्त 13 दिवस अन् गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट, ‘हे’ आहे कारण

Gunaratna Sadavarte : नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची बिग बॉसच्या घरातून

  • Written By: Last Updated:

Gunaratna Sadavarte : नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 13 दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस 18 च्या घरात एंट्री घेतली होती मात्र यांच्या या एंट्रीनंतर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी सुरु असताना गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस 18 च्या (Bigg Boss 18) घरात एंट्री घेतल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार गुणरत्न सदावर्ते यांची  बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे. माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते एका केससाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट नुसार गुणरत्न सदावर्ते एका केससाठी घरातून बाहेर पडले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून मनोरंजन करणारे गुणरत्न सदावर्ते आता घरात दिसणार नाही.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घरातून बाहेर पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येऊ शकतात, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणी सुरु असताना बिग बॉसच्या घरात एंट्री केल्याने त्यांच्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

सुनावणी सुरु असताना  गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात गेले असल्याची माहिती इतर वकिलांनी आम्हाला दिली आहे. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल देखील यावेळी उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता तसेच या प्रकरणाची सुनावणी करा अशी विनंती आमच्याकडे सदावर्ते करत होते मात्र आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले. असं देखील  उच्च न्यायालयाने म्हटले होते.

follow us