Gurucharan Singh On His Missing: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) रोशन सोधीच्या भूमिकेतून गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) हे घराघरात प्रसिद्ध झाले. मात्र नंतर त्याने हा शो सोडला. (TMKOC ) हा अभिनेता प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा तो त्याच्या घरातून अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर 26 दिवसांनंतर अभिनेता स्वतः घरी परतला. आता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) यांनी एका मुलाखतीत त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे खरं सत्य सांगितले आहे.
रोशन सोधी का गायब झाले?
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) यांनी त्यांच्या बेपत्ता होण्याचे खरं सत्य सांगितले आहे. अभिनेता म्हणाला की, “एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या कुटुंबापासून आणि जगापासून दूर करता. काम शोधण्याचा प्रयत्न करूनही, मला प्रियजनांनी दुखावले. मला सतत नकाराचा सामना करावा लागत होता. असे म्हटल्यावर मला माहीत होते, काहीही झाले तरी मी आत्महत्येचा विचार करणार नाही.
गुरुचरण सिंग कर्जामुळे बेपत्ता
51 वर्षीय अभिनेत्याने पुढे खुलासा केला की तो कर्जात बुडाल्यामुळे तो गायब झाला नाही. तो म्हणाला, “मी कर्जात बुडालो होतो किंवा कर्ज फेडू शकलो नाही म्हणून मी गायब झालो नाही. माझ्यावर अजून कर्ज आहे. माझा हेतू चांगला आहे आणि कर्ज घेतल्यानंतरही मी क्रेडिट कार्ड आणि ईएमआय भरणार आहे.
बेपत्ता झाल्यानंतर 26 दिवसांनी घरी परतले
गुरुचरण सिंग या वर्षी एप्रिलमध्ये बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, 26 दिवसांनी तो घरी परतला. परत आल्यावर, सिंग यांची दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्यानंतर ते धार्मिक यात्रेला जाण्यासाठी घरातून निघाल्याचे उघड झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते की गुरुचरण यांनी “बेपत्ता” झाल्याची तक्रार केल्यानंतर अमृतसर आणि लुधियाना येथील गुरुद्वारांना भेट दिली होती, परंतु नंतर त्यांना घरी परत जावे असे समजले.
Gurucharan Singh: 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी; म्हणाला, ‘दुनियादारी सोडून मी…‘
गुरुचरण सिंग यांना परत यायचे नव्हते
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंग यांनी बेपत्ता होण्याबाबत सांगितले होते की, त्यांचा परतण्याचा कोणताही विचार नव्हता. ते म्हणाले होते, “माझ्या आई-वडिलांमुळे मी नेहमीच अध्यात्मिक राहिलो आणि आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा मला नैराश्य येत होते, तेव्हा मी देवाकडे वळलो. मी आध्यात्मिक प्रवासाला निघालो होतो आणि परत येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण देवाने मला एक संकेत दिले आणि त्याने मला घरी परतण्यास भाग पाडले.