Gurucharan Singh: 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी; म्हणाला, ‘दुनियादारी सोडून मी…’

Gurucharan Singh: 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी; म्हणाला, ‘दुनियादारी सोडून मी…’

Gurucharan Singh Missing Case: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) स्टार गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. रोशन सिंग सोधीची (Roshan Singh Sodhi) भूमिका साकारणारा अभिनेता 22 एप्रिलपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याची संपूर्ण कुटुंबही चिंतेत होते. गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला निघाल्याचे त्याच्या कुटूंबियांनी सांगितले. तो मुंबईला पोहोचला नाही आणि त्याच्याशी संपर्कही झाला नाही. मात्र आता तारक मेहताचा सोढी 26 दिवसांनी घरी परतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)


सोधी होते ‘धार्मिक सहलीवर’

गुरुचरण सिंग जवळपास 26 दिवस बेपत्ता राहिल्यानंतर 17 मे रोजी घरी परतले. अभिनेत्याची दिल्ली पोलिसांनी प्रथम चौकशी केली. अहवालात असे समोर आले आहे की अभिनेत्याने पोलिसांना सांगितले की तो ‘धार्मिक यात्रेला’ जाण्यासाठी घर सोडला होता. अमृतसर आणि लुधियानाच्या गुरुद्वारांमध्ये राहिल्याचे त्याने सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांना हे देखील आढळून आले की गुरुचरण सिंह हे एका पंथाचे अनुयायी होते जे ध्यान करत होते आणि यासाठी त्यांना हिमालयात जायचे होते. गुरुचरण सिंग घरी परतले कारण त्यांना समजले की कुटुंबच सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते घरी परतले.

Mirzapur 3 : आनंदाची बातमी! मिर्झापूर 3 चे मोठे अपडेट, वेब सिरीज लवकरच होणार रिलीज

गुरुचरण सिंग 26 दिवस बेपत्ता होते

गुरुचरण सिंह 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला निघाले होते. पण गुरुचरण यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर त्याच्याबाबत अनेक खुलासे झाले. गुरुचरण सिंग जवळपास 10 बँक खाती चालवत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यानंतर त्याने आपला फोन पालममध्ये सोडला. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवरही पोहोचले. अभिनेता बेपत्ता झाल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, आता सोढी आपल्या घरी परतला आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज